हिंदुस्थान युनिलिव्हरला तिसऱ्या तिमाहीत रु. २२४३/- करोड नफा I Hindustan Unilever profit of Rs. 2243/- Crore I
हिंदुस्थान युनिलिव्हरला तिसऱ्या तिमाहीत रु. २२४३/- करोड नफा
FMCG क्षेत्रातील हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात १६.७६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २२४३/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १९२१/- करोड होती. कंपनीला इतर उत्पन्नांसहित एकूण महसूल १०.२३% ने वाढला असून हि रक्कम रु. १३,१८३/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११,९५९/- करोड होती. एकूण विक्री रु. १२,९००/- करोड असून मागील वर्षी एकूण विक्री रु. ११,६८२/- करोड होती. या तिमाहीत नफ्यात वाढ व सर्व विभागात मार्केट शेअर वाढला आहे. शहरी व ग्रामीण भागात मागणीत वाढ झाली आहे. भारतीय FMCG क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचे कंपनीने सांगितले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo