स्मार्ट होम कॅमेऱ्यांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो – गोदरेज सर्वेक्षण

स्मार्ट होम कॅमेऱ्यांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो – गोदरेज सर्वेक्षण

~७५ टक्के स्त्रियांना आनंदासाठी सुरक्षितता महत्त्वाची वाटते

~या सर्व्हेनुसार ९६ टक्के स्त्रियांची टेक सिक्युरिटी सुविधांना पसंती

भारत११ मे २०२५ – गोदरेज एंटरप्रायजेस ग्रुपच्या सुरक्षा सुविधा व्यवसायाने नवीन हॅपीनेस इंडेक्स सर्व्हे प्रकाशित केला असून त्यात ७५ टक्के स्त्रियांना घरात सुरक्षेच्या अत्याधुनिक सुविधा असल्याने जास्त आनंद मिळतो असे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुविधा वापरल्याने त्यांना जास्त दिलासा मिळतो असेही यात मांडण्यात आले आहे. मदर्स डे च्या पार्श्वभूमीवर कंपनीने सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे आत्मविश्वास आणि मनस्वास्थ्य मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे समोर आणण्याचे ध्येय ठेवले आहे. हा घटक दैनंदिन आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनत असल्याचे मानणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत असल्याकडेही कंपनीने लक्ष वेधायचे ठरवले आहे.

या सर्व्हेच्या निरीक्षणांविषयी गोदरेज एंटरप्रायजेस ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख श्री. पुष्कर गोखले म्हणाले, सुरक्षा म्हणजे नुसतं संरक्षण नाहीतर तो स्त्रियांना त्यांच्या महत्त्वाकांक्षाआत्मविश्वास आणि आनंदाच्या उभारणीसाठी लागणारा पाया आहे. या सर्व्हेमध्ये एक मूलभूत सत्य अधोरेखित करण्यात आले आहे आणि ते म्हणजेजेव्हा स्त्रियांना त्यांच्या घरी व आजूबाजूच्या वातावरणात सुरक्षित वाटतंतेव्हा त्यांना आपली ध्येयंकुटुंब आणि स्वास्थ्यावर कोणत्याही तणावाशिवाय लक्ष केंद्रित करता येतं. हा सर्व्हे समाजाच्या बदलत्या गरजांशी सुसंगत सुरक्षा सुविधांना प्राधान्य देण्याची वेळ आल्याचं अधोरेखित करतो. होम सिक्युरिटी सोल्यूशन्स उदा. वायफाय होम कॅमेरे आणि व्हिडिओ डोअर फोन्सव्यावसायिक सिक्युरिटी सेवा यांचा वापर करण्याचे वाढते प्रमाण आपला समाज सुरक्षेबरोबरच मनःशांतीलाही प्राधान्य देत असल्याचे दर्शवणारा आहे. सामाजिक समीकरणे बदलत असून सुरक्षा ही चिंतेची बाब नाहीतर ती नैसर्गिक वाटणारे वातावरण तयार करण्याची गरज आहे. या निरीक्षणांमुळे गृह सुरक्षा सुविधा आणखी अत्याधुनिक करण्याची व प्रत्येक स्त्रीलाविशेषतः प्रत्येक आईला आत्मविश्वास व मनःशांती देणारे भविष्य घडवण्याची आमची बांधिलकी आणखी बळकट झाली आहे.

या सर्व्हेनुसार अंदाजे ९४ टक्के स्त्रियांना त्यांच्या आनंदासाठी सुरक्षा महत्त्वाची वाटते आणि त्यासाठी आधुनिक व विश्वासार्ह सुरक्षा उपाययोजनांची गरज त्या व्यक्त करतात. या सर्व्हेमध्ये पसंतीच्या सुरक्षा सुविधांमध्ये बदल झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. नुसार ४५ टक्के स्त्रिया स्मार्ट होम कॅमेऱ्यांची कॅमेरे निवड करतात आणि ४१ टक्के स्त्रिया होम लॉकर्सना (तिजोरी) प्राधान्य देतात, तर २१ टक्के स्त्रिया व्हिडिओ डोअर फोन्सची निवड करतात. ३६ टक्के स्त्रियांना सुरक्षेसाठी सिक्युरिटी गार्ड आवश्यक वाटतो. या निरीक्षणांतून सुरक्षित व आत्मविश्वासपूर्ण जीवनशैलीला आकार देण्यात सुरक्षा महत्त्वाची असल्याबद्दल जागरूकता वाढत असल्याचे दिसून आले आहे.

त्याचप्रमाणे या सर्व्हेमध्ये सर्व्हेलन्स कॅमेरे आपली मुलं, वृद्धांना घरी सोडून कामावर जावं लागणाऱ्या स्त्रियांना जास्त आत्मविश्वास मिळवून देतात असे प्रामुख्याने दिसून आले आहे.

सुरक्षेबरोबरच स्त्रियांना त्यांच्या आनंदासाठी महत्त्वाचे वाटणारे इतर घटकही या सर्व्हेमध्ये मांडण्यात आले आहेत. ४० टक्के स्त्रिया आनंदामध्ये कुटुंबाचा वाटा असल्याचे सांगतात, तर १४ टक्के स्त्रियांना आरोग्यामुळे आनंद मिळतो असे वाटते आणि ८ टक्के स्त्रियांना भावनिक सुरक्षेशी त्याचा संबंध लावतात. उर्वरित ३८ टक्के स्त्रिया आणि सामाजिक घटक त्यांच्या स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे असल्याचे मानतात. या निरीक्षणांतून सुरक्षा व एकंदर आनंदाचा जवळचा संबंध असल्याचे दिसून येते तसेच कशाप्रकारे सुरक्षित वातावरणामुळे आयुष्याच्या विविध पैलूंवर सकारात्मक परिणाम घडून येऊ शकतो हे अधोरेखित होते.

गोदरेज एंटरप्रायजेस ग्रुपच्या सिक्युरिटी सोल्यूशन्स व्यवसायाने कायमच नाविन्य आणि विश्वासार्हतेचा मेळ घालत सुरक्षेची समीकरणे नव्याने तयार केली आहेत. सुरक्षा तंत्रज्ञानात सातत्यपूर्ण गुंतवणूक करत कंपनी फक्त सुरक्षितच नव्हे, तर त्याचबरोबर आत्मविश्वास आणि मनःशांती देणारे भविष्य घडवण्यासाठी बांधील आहे. विकसित सुरक्षा उपाययोजना उपलब्ध करून नागरिकांना वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर सक्षम करण्याचे व अर्थपूर्ण जीवनासाठी सुरक्षेचा भक्कम पाया रचण्याचे ध्येय कंपनीने ठेवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *