सेंचुरी टेक्सटाईलला रु. ८४/- कोटी नफा I Century Textile profit of Rs. 84/- Crore I
सेंचुरी टेक्सटाईलला रु. ८४/- कोटी नफा
सेंचुरी टेक्सटाईलला चौथ्या तिमाहीत रु. ८४/- कोटीचे निव्वळ उत्पन्न
सेंचुरी टेक्सटाईल अँन्ड इंडस्ट्रीजने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत कंपनीला रु.८४/- कोटीचे निव्वळ उत्पन्न मिळाले असून मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ५/- कोटीचा निव्वळ तोटा झाला होता. विक्रीत ४५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ११८८/- कोटी आहे. २०२२ आर्थिक वर्षात कंपनीला रु.२००/- कोटी चे निव्वळ उत्पन्न मिळाले असून त्यात चौपट वाढ झाली आहे. २०२१ आर्थिक वर्षात कंपनीला रु. ५०/- कोटी चे निव्वळ उत्पन्न मिळाले होते. २०२२ आर्थिक वर्षात महसुलात ५४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४०६७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २५६४/- कोटी होती. पल्प व पेपर बिझनेस मधून कंपनीला विक्रीत वाढ झाली आहे. बिर्ला इस्टेट या विभागातून बिर्ला नियार प्रोजेक्ट मध्ये रु.१२०० /- कोटी चे बुकिंग झाले आहे. रिअल इस्टेट विभागात एकूण विक्री तिपटीने वाढली असून रु.१९१३/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo