श्री हेमंत सावंत – मी मराठी व्यावसायिक एकीकरण समिती I मराठी भाषा दिवस I रायगडावर पुस्तक प्रकाशन I
श्री हेमंत सावंत – मी मराठी व्यावसायिक एकीकरण समिती I मराठी भाषा दिवस I रायगडावर पुस्तक प्रकाशन I
‘लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग १ व भाग २’ सवलत किंमत रु. ५००/- मध्ये दोन्ही पुस्तके पोस्टेजसह उपलब्ध (मूळ किंमत रु. ६००/-) पुस्तक खरेदीसाठी संपर्क – ८०८२३४९८२२
रायगडावर मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने ‘लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा!’ भाग २ पुस्तकाचे प्रकाशन’
महाराष्ट्राच्या उद्योग जगताला प्रेरणा देण्यासाठी अर्थसंकेत व मी मराठी व्यावसायिक एकीकरण समितीचा उपक्रम !
‘लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा!’ भाग २ या पुस्तकाचे प्रकाशन ‘किल्ले रायगड’ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने करण्यात आले. MEPLचे श्री सुधीर म्हात्रे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे, सौ रचना बागवे, मी मराठी व्यावसायिक एकीकरण समितीचे श्री मंदार नार्वेकर व श्री हेमंत सावंत, भालचंद्र खाडे उपस्थित होते.
मराठी भाषा दिनानिमित्त हा कार्यक्रम मराठी भाषा शुद्धीकरणासाठी महाराजांनी दिलेल्या योगदानासाठी का उपक्रम समर्पित करण्यात आला आहे. अर्थसंकेत व मी मराठी व्यावसायिक एकीकरण समितीद्वारे या कार्यक्रमाची संकल्पना मांडण्यात आली व पूर्णत्वाला नेण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने संपूर्ण महाराष्ट्राच्या उदयोग जगातला नवीन प्रेरणा मिळेल अशी आशा डॉ अमित बागवे व श्री मंदार नार्वेकर यांनी व्यक्त केली.
भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राचे योगदान सर्वात मोठे आहे. कोरोनाच्या काळात महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायाला उतरती कळा लागली होती, परंतु दिवाळी नंतर पुन्हा एकदा उद्योग व्यवसाय नव्या जोमाने सुरु होत आहेत.
महाराष्ट्रातील उद्योजकांचे मनोबल वाढावे व नवीन उद्योजकांना सुद्धा स्फूर्ती मिळावी या उद्देशाने अर्थसंकेत तर्फे ‘लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा!’ भाग १ या पुस्तकाचे प्रकाशन हेलिकॉप्टर मधून भरारी घेऊन करण्यात आले.
‘लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा!’ या पुस्तकामध्ये ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’ कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या ब्रँड्सची यशोगाथा मांडण्यात आली आहे. ज्याद्वारे सर्व उद्योग जगताला मार्गदर्शन मिळणार आहे.
हेलिकॉप्टर मध्ये पुस्तक प्रकाशन करून डॉ अमित बागवे यांनी केला विश्वविक्रम I Helicopter Book Launch
‘लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग १ व भाग २’ सवलत किंमत रु. ५००/- मध्ये दोन्ही पुस्तके पोस्टेजसह उपलब्ध (मूळ किंमत रु. ६००/-) पुस्तक खरेदीसाठी संपर्क – ८०८२३४९८२२