श्री. चंद्रहास गोपीनाथ रहाटे I अर्थसंकेत व्यक्तिमत्व विशेष I
श्री. चंद्रहास गोपीनाथ रहाटे I अर्थसंकेत व्यक्तिमत्व विशेष I
आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करायची असतात. जसे नवीन आणि मोठे घर, नवीन गाडी, मुलांचे उत्तम प्रतीचे शिक्षण, मुलांची लग्ने, विविध जीवनावश्यक वस्तू व सेवा, स्वतःचे निवृत्ती नियोजन. हि अशी आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे समजून घेणे त्यासाठी लागणारी किंमत व तेव्हढे पैसे त्या त्या वेळी उपलब्ध असणे.
श्री. चंद्रहास गोपीनाथ रहाटे तुम्हाला या सर्व आर्थिक उद्दिष्टांसाठी करावी लागणारी गुंतवणूक व त्यावर मिळणारा परतावा, त्यावर ठेवावे लागणारे लक्ष व त्यात गरजेनुसार करावी लागणारे बदल यात मदत करणार आहेत.
सामान्य मध्यमवर्गीय, उद्योजक ते अगदी चित्रपट कलाकार असे जवळपास १६०० कुटुंबे त्यांची सेवा घेतात.
श्री. चंद्रहास रहाटे यांनी सर्वसामान्य माणसांपासून अगदी भरत जाधव अशा चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांना सुद्धा गुंतवणूक व आर्थिक नियोजन विषयावर मार्गदर्शन केले आहे.
दूरदर्शन सह्याद्री वाहिनी व जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर गुंतवणूक विषयावर लाईव्ह शो तसेच महाराष्ट्र टाइम्स, सामना, तरुण भारत अशा विविध वर्तमानपत्रात श्री. चंद्रहास रहाटे आर्थिक नियोजन विषयवार लेख लिहून संपूर्ण महाराष्ट्राला अर्थसाक्षर करण्याचे कार्य ते मोठ्या आवडीने करीत असतात.
एकूण ३३ वर्षांचा कामाचा अनुभव असणारे श्री. चंद्रहास हे एल आय सी ऑफ इंडियाचे गॅलेक्सी क्लब सदस्य आहेत. तसेच ते MDRT USA – १७ वेळा झाले आहेत, तर कोर्ट ऑफ द टेबल यू एस ए – ४ वेळा झाले आहेत. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा ‘व्यवसाय उत्कृष्टता पुरस्कार’ सुद्धा त्यांना मिळाला आहे.
सामाजिक कार्यात पुढाकार घेणारी संस्था रोटरी क्लब भांडुपचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले आहे.
श्री. चंद्रहास रहाटे हे जरी रटाळ वाटणाऱ्या आर्थिक नियोजन या क्षेत्रात कार्यरत असले तरी, ते हळव्या मनाचे उत्तम कवी सुद्धा आहेत. त्यांची कवितेवरील ‘कविता तुझी माझी’, ‘समबडी कुणीतरी प्रेम कराव’ हि दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. तसेच कवितेवरील लाईव्ह शो – ‘आठवणींच्या फुला, हृदय दिले तुला !’ हा कार्यक्रम सुद्धा ते लोक रंजनासाठी करीत असतात. ‘समबडी कुणीतरी प्रेम कराव’ हे त्यांचे गाणे युट्युब वर प्रचंड लोकप्रिय झाले आहे. या गाण्यासाठी त्यांना NIFF पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.
महाराष्ट्र टीव्हीवर अभिनेत्री समीरा गुजर यांनी श्री. चंद्रहास रहाटे यांची खास मुलाखत सुद्धा घेतली आहे.
श्री. चंद्रहास रहाटे आर्थिक नियोजन विषयावर मार्गदर्शन व मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. जर तुम्हालाही गुंतवणूक, विमा, आर्थिक नियोजन या विषयावर मदत हवी असेल तर नक्की संपर्क करा.
Contact – http://Wa.me/+919820298093
मोबाईल – 9820298093
Email – cgrlic@yahoo.com
गुंतवणूक विषयी सर्व माहितीसाठी आणि सी जी आर फिनटीमचे मोबाईल ऍप सुद्धा डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.dwt.cgrfinteam
श्री. चंद्रहास रहाटे यांच्या युट्युब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.
https://www.youtube.com/@chandrahasrahate5728/videos
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे