शेअर मार्केटमधील गुंतवणूक – श्री मनोज साठे (भाग १)
शेअर मार्केटमधील गुंतवणूक – श्री मनोज साठे (भाग १)
शेअर मार्केटमधील गुंतवणूक – श्री मनोज साठे
ⓒ अर्थसंकेत
अर्थसंकेत लॉकडाऊन विशेष !
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा !
अर्थसंकेत – मराठी माणसाचा खरा मित्र !
श्री मनोज साठे यांनी अर्थसंकेत मार्फत मार्गदर्शन केले.
आज आपण सर्वजण लॉकडाऊन मध्ये अडकलो आहोत .आता पुढे काय याची चिंता सर्वांनाच लागून राहिली आहे.आपण दररोज वेगवेगळ्या बातम्या ऐकत असतो .बरेच व्यवसाय बंद पडले आहेत . तर काही व्यवसाय अजूनही पूर्वीसारखे चालू आहेत. त्यामध्ये आपण बघितले तर फायनान्स क्षेत्रातील बँका, कॅपिटल मार्केट , इन्शुरन्स या संबंधित व्यवसाय सुरु आहेत.
आपण सर्वांनी या बदलाबरोबर स्वतःला जुळवून घेतले पाहिजे. नवीन गोष्टी शिकून आणखी कोणत्या मार्गाने अर्थार्जन करू शकतो याचा विचार केला पाहिजे .आज अनेक व्यवसाय बंद आहेत. पण आपण घरात बसून आपले कष्टाचे पैसे शेअर बाजारात गुंतवून चांगला नफा कमावू शकतो. व अर्थार्जनाचा हा एक उत्तम मार्ग आहे.
मी गेली बावीस वर्ष NSDL – नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड या संस्थेत कार्यरत होतो. मागील काही महिन्यापूर्वी मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे .NSDL मध्ये आठ वर्ष इन्वेस्टर एज्युकेशन प्रमुख म्हणून काम केले आहे .भारतातील असंख्य गुंतवणूकदारांचा या काळात मी अभ्यास केला आहे. आज भारतातील लोकांचे शेअर बाजार गुंतवणुकी विषयी अनेक गैरसमज आहेत. हा सट्टा आहे, जुगार आहे.असे काहींचे मत आहे. शेअर बाजार काय आहे हे अनेकांना समजत देखील नाही. यात पैसे मिळत नाही असे काही जुन्या लोकांचे मत आहे. पण शेअर बाजारात आज उपलब्ध संधी जाणून घेण्यासाठी आज आपण चर्चा करीत आहोत.
आज अमेरिकेत पाहिले तर 56 ते 60 टक्के लोक शेअर बाजारात पैसे गुंतवतात. चीनमध्ये देखील 18 कोटी जनता शेअर बाजारात पैसे गुंतवते. भारतात 138 कोटीं जनतेपैकी १८ ते २७ वयोगटातील लोकांनी काही पैसे गुंतवणूक केले तर त्यांना शेअर बाजारातून नफा कामविता येईल. भारतात थेट शेअर बाजारात गुंतवणूक करणारे लोक एक कोटीहून कमी आहेत. हे प्रमाण खूपच कमी आहे.पण जास्तीत जास्त लोकांनी या क्षेत्रात गुंतवणूक केल्यास शेअर मार्केट मधून आपण अधिक परतावा मिळू शकतो .
1980 च्या दशकात बँका चौदा ते पंधरा टक्के व्याजदर देत असत. आज 2020 मध्ये हा दर पाच ते सहा टक्के पर्यंत कमी झाला आहे .त्याच बरोबर 1979 मध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १०० सेन्सेक्स पॉईंट पासून आज तीस हजार सेन्सेक्स पॉईंट पर्यंत पोहोचला आहे. काही वेळा 40 ते 42 हजार देखील झाला आहे. हा निर्देशांक सतत वाढत जाणार व तुमची गुंतवणूक देखील या बरोबर वाढणार आहे.
अर्थसंकेत – मराठी उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ !
“Arthsanket Open Networking & Business Growth Challenge”
Gifts and Benefits worth Rs. 15,000/- Per Business
For Details send on WhatsApp your Name, Business Name, Business Details, Location
Contact 8082349822
T & C Apply