लघुउदयॊगांचे भीष्म पितामह डॉ.मधुसूदन तथा अप्पासाहेब खांबेटे – एक समाजधुरीण उद्योजक
लघुउदयॊगांचे भीष्म पितामह डॉ.मधुसूदन तथा अप्पासाहेब खांबेटे
एक समाजधुरीण उद्योजक
सर्व सुधारणांचा पिता
राष्ट्रपतींनी ३० जुन २०१७ मध्यरात्री १२. ०० च्या सुमारास वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्याची अधिकृत घोषणा केली,देशभरात त्यापूर्वी लागू असलेले १७ वेगवेगळे अप्रत्यक्ष कर रद्द करून ही करप्रणाली भारतात लागू करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर प्रथमच संपूर्ण भारतातील उद्योगांसाठी सुधारणांचे पर्व सुरु झाले त्यामुळे संपूर्ण देशात वस्तू व सेवा कर (वन नेशन वन टॅक्स( – एक राष्ट्, एक कर, एक बाजार लागू करून सर्व राज्य व केंद्र शासित प्रदेशांच्या अखंड सीमा बांधल्या.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच संपूर्ण भारतातील उद्योगांसाठी सुधारणांचे पर्व सुरु झाले त्यामुळे संपूर्ण देशात वस्तू व सेवाकर वन नेशन वन टॅक्स (वस्तू व सेवा कर – एक राष्ट्, एक कर, एक बाजार लागू करून सर्व राज्य व केंद्र शासित प्रदेशांच्या अखंड सीमा बांधल्या गेल्या.
त्यावेळेस ८५ वर्षाच्या डॉ. मधुसूदन तथा अप्पासाहेब खांबेटे अध्यक्ष कोसिआ या अखिल भारतीय स्तरावरील राष्ट्रीय संस्था तसेच टिसा यांच्या साठी व सर्व उद्योगांसाठी शांतीचा व समाधानाचा क्षणं होता. कारण गेल्या ३ दशकांपेक्षा जास्त काळ जकात तसेच वेगवेगळ्या १७ प्रकारचे कर व तदनंतर आलेला स्थानिक संस्था कर रद्द करण्यासाठी केलेल्या विविध प्रकारच्या आंदोलनाला, सभा व बैठकांना कायमस्वरूपी विराम मिळाला. ह्यामुळे इन्स्पेक्टर राज व लाल फिती पासून लघु व मध्यम उद्योगांची कायमची सुटका झाली. उद्योगांवर कॅसकेडिंग इफेक्ट करणारे कर बंद झाल्यामुळे आपसूकच प्रामाणिक उद्योगांना मदत होण्यासाठी यंत्रणा तयार झाली.
खांबेटे या दरम्यान शांत बसणारे नव्हते
वस्तू व सेवा कराचे समर्थन केल्यानंतर योग्यप्रकारे लागू होतो आहे कि नाही किंवा वस्तू व सेवा कराच्या तरतुदी उद्योग स्नेही असाव्या ह्याकरिता व त्याचे परिणाम उद्योगांवरती होऊ नये म्हणून परिणामांची माहिती करून घेण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सुमारे डझनभर गटचर्चा, चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित करून त्याद्वारे वस्तू व सेवा करा मध्ये काय अडचणी आहेत याची सविस्तर माहिती गोळा करून अभ्यासपूर्ण मुद्देसूद निवेदन संस्थेच्या उपाध्यक्ष श्री संदीप पारीख आणि खा. श्री विनयजी यांचे मार्फत दिल्लीला पाठवून प्रत्यक्ष वित्त मंत्रालयाकडे व जीएसटी कौन्सिल कडे दिले.
वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी झाल्यावर सुरवातीचा काही काळ जरा त्रासदायक गेला परंतु उद्योग व व्यापारी क्षेत्राकडून अडचणी जशा जशा सरकारच्या लक्षात आल्यावर त्यात वेळोवेळी सुधारणा होत गेल्या आणि आता वस्तू सेवाकर सोईचा होत आहे. उद्योजकांना विविध प्रकारच्या कायदेविषयक बदल , सुधारणा तसेच इतर धोरणात्मक बाबी , शासनाच्या विविध योजना व सवलती बदल ठाणे लघु उद्योग संघटना निरंतर सेमिनार व चर्चासत्र , प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून उद्योगांना अद्यावत ठेवण्याचे काम अव्याहत पणे करीत आहे.
डॉ मधुसूदन उर्फ अप्पासाहेब खांबेटे यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अंजर्ले या गावात स्वातंत्र्यापूर्वी झाला. ते तीन महिन्यांचे असतानाच कोलकाता येथे नेण्यात आले . त्यांचे वडील कोलकाता येथील मायर्स पंपमध्ये मॅनेजर होते त्यामुळे सुरवातीला त्यांचे शिक्षण एंग्लो गुजराती स्कूल या गुजराती माध्यमाच्या शाळेत १९३८ ते १९४२ दरम्यान शिक्षण झाले .त्यामुळे त्यांना इंग्रजी, हिंदी आणि मूळ भाषा मराठी याव्यतिरिक्त गुजराती आणि बंगाली अस्खलितपणे बोलतात हे आश्चर्यकारक.
दुसर्या महायुद्धात जपानी लोकांनी कोलकाता येथे बॉम्बस्फोट केल्यामुळे तरुणपणी खांबेटे यांना नागपुरात नातेवाईकांसोबत राहायला पाठवले होते, तर त्याचे वडील कोलकाता मध्ये राहिले होते. त्यांनी १९४८ मध्ये स्वातंत्र्या नंतर नागपुरात मॅट्रिक पूर्ण. केले त्यानंतर त्यांना त्याच्या मामाकडे राहण्यासाठी तत्कालीन मुंबईच्या बाहेरील मुलुंड येथे पाठवले गेले. तेथे त्यांनी नारायणराव टोपीवाला महाविद्यालयात आपले इंटरमीडिएटपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. ते फक्त एक खेळाडूच नव्हते तर त्यांनी आपल्या शाळेच्या हॉकी, फुटबॉल आणि खो-खो संघाचे नेतृत्व सुद्धा केले आणि येथे नेतृत्व गुणधर्म दाखविल्यामुळे त्यांच्यात ते पुढे चांगले टिकून राहिले.
इंटरमिजिएट सायन्स पूर्ण केल्यानंतर ते पुन्हा कोलकाताला गेले. त्याची सुरुवातीची आवड एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची होती, दरम्यान डम डम विमानतळाजवळील संस्थेत १९५३ पर्यंत गेल्यानंतर ३वर्षानी, मधू खांबेटे या तरुणास भयानक बातमी मिळाली की सरकारने एअरलाईन उद्योग ताब्यात घेतलयाचे जाहीर झाले आणि तेथील अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येणार असल्याचे समजल्यावर त्याच्या सर्व आशा ढासळल्यामुळे त्या कोर्सला पुढे जाण्यात काहीच अर्थ उरला नाही. त्याचे वडील पण खूप रागावले होते. परंतु अगदी सुदैवाने त्यांना
मे. वेस्टिंगहाऊस सॅक्सबी अँड फार्मर मध्ये ब्रेक मिळाला, तिथे त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून नेमण्यात आले, फॅक्टरीत आठवड्यातून चार दिवस काम करायचे व २ दिवस कॉलेजमध्ये हजेरी लावून, इलेक्ट्रिकल आणि मेकेनिकल इंजिनिअरिंग या दोन्ही पदविका पदविका घेतल्या.
शिकाऊ (अप्रेन्टिस ) उमेदवार म्हणून नेमणूक
शिकाऊ उमेदवार म्हणून नेमणूक झालेल्या तरुण मधू खांबेटे यांनी आपली अप्रेंटिसशिप हलक्यावर घेतली नाही. त्यानी फोरमनला बरेच प्रश्न विचारले परंतु तो स्पष्टीकरण देत नव्हता त्यानंतर त्यांनी प्रश्न वर्क्स मॅनेजरकडे नेले त्याला सुद्धा फोरमन इतकाच रस नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी राजीनामा लिहून,थेट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री.गुडचिल्ड यांच्या कॅबिनमध्ये प्रवेश केला आणि त्यांना सांगितले की जर माझ्या प्रश्नांना उत्तरे दिली जात नसतील तर माझे आपल्या कंपनीतील प्रशिक्षण निरर्थक आहे आहे आणि म्हणून मी राजीनामा देण्यास तयार आहे. श्री गुडचिल्ड यांच्या नावाप्रमाणेच गुड होते त्यांच्या नावाने रेल्वे उपकरणात 10 पेटंट आहेत, त्यांनी धीराने ऐकले व राजीनामा खिशात ठेवून पुढे जाण्यासाठी मन वळवले. दर ४ त ६ महिन्यांनी त्यांना विविध विभागात, मशीन शॉप, प्रशासन, टूल रूम इत्यादी माध्यमातून फिरवले जायचे. ते त्यांच्या कार्यात इतके मग्न असायचे कि अनेकदा श्री गुडचील्ड कारखानयात अधून मधून फेऱ्या मारायचे आणि हे त्यांच्या कडे बघायचे देखील नाही इतके कामात गुंतून जायचे कि ते समोर कोण आहे विसरायचे , तर बाकीचे कर्मचारी आणि कामगार मात्र आपापल्या जागी उभे राहायचे. मधु खांबेटे ह्या युवकाच्या कामातील समर्पणाच्या आणि एकाग्रतेच्या भावनेनें श्री गुडचील्ड, व्यवस्थापकीय संचालकांची पसंती त्यांना मिळाली त्याचे कारण जवळ जवळ 250 अभियंते आणि 3500 कर्मचार्यांपैकी मधु खांबेटे यांची इंग्लंड मध्ये 8 महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली.हे प्रशिक्षण इतके महत्वाचे होते की मेसर्स वेस्टिंग हाऊसच्या भारतातील कारखान्या मध्ये अधिकाधिक स्वदेशी उत्पादन चालू करण्यासाठी भारत सरकारचा मोठ्या प्रमाणात दबाव होता.
कोलकाता मध्ये एक उद्योजक घडला:
भारतात परत आल्यावर कंपनीने त्यांना आर अँड डी मध्ये पोस्ट केले , त्यावेळेस त्यांना व्हॅक्यूम आणि एअर ब्रेक्सवर (ईएमयू(इलेक्ट्रो मॅग्नेटिक युनिट वर लक्ष केंद्रित केले होते ,आपल्या कामाचा एक भाग म्हणून मधु खांबेटे यांना रेल्वेच्या पेरंबूर येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी, जमशेदपूर येथील टाटा लोकोमोटिव्ह वर्क्स आणि वाराणसी येथील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्सला भेटोनि देऊन खूप प्रवास केला. श्री खांबेटे सतत काही तरी नावीन्यपूर्ण आणि सुधारणा करण्यात माहीर असल्याने आणि कारखान्यात एवढ्या मोठ्या चिकाटीने काम करत असल्याने विचार आला कि आपण आपण स्वतः काम समजून घेणार इतके हुशार आहोत आणि हेच योगदान नोकरी पेक्षा आपली स्वतःची कंपनी स्थापन करून दिले तर? आणि त्यातूनच वयाच्या ३२व्या वर्षी स्वत:चे स्वतंत्र युनिट सुरू करण्याचा विचार त्याच्या मनात आला. दोन गोष्टी मनात पक्क्या केल्या होत्या त्यापैकी एक कंपनीबद्दल त्याची निष्ठा होती ज्यामुळे त्याला चांगले स्थान आणि मान्यता मिळवून दिली हे विशेष . कंपनीने त्याच्यावर कोणतेही बंधन घातले नव्हते परंतु त्याच्यावर एक नैतिक जबाबदारी होती. दुसरे म्हणजे ते आता 32 वर्षांचे होते, आधीच लग्न केलेले आहे, दोन मुलं होती आणि कोणतेही आर्थिक पाठबळ नव्हते, परंतु नशिब किंवा चिकाटी असेल तर माणूस काहीही करू शकतो, कोलकाता येथे खांबेटे यांच्या निवासस्थानासमोर एक बिहारी सिंग नावाचे कुटुंब राहत होते त्यांचा तबेला होता, बिहारी सिंग यांच्याकडे 100 सायकल रिक्षा होत्या पण त्यांच्या मुलाने आयुष्यात काही तरी चांगले करावे असे त्यांना वाटले आणि त्यांच्या शर्ती नुसार खांबेटे यांनी बिहारी सिंग यांच्या मुलास श्री शाम बिहारी सिंग यास भागीदार म्हणून घेण्याचे पक्के केले आणि सोबत त्याचा खास मित्र एस.व्ही. जोशी होताच या तिघांनी मिळून न्यूमॅटिक्स आणि हायड्रॉलिक पाईप फिटिंग्ज तयार करण्यासाठी तबेल्याच्या एका भागात मे. एस्केजी इंजिनीअर्स नावाचे एक छोटेसे युनिट स्थापन करून उद्योजकतेची मुहूर्तमेढ कोलकत्यात रोवली.
जेव्हा खांबेटे ह्यांनी आपल्या मे. वेस्टिंगहाऊस सॅक्सबी अँड फार्मर च्या वर्क मॅनेजर श्री पॉवेल यांना आपला राजीनामा सादर केला होता तेव्हा श्री पॉवेल यांनी खांबेटेच्या खांद्यावर हात ठेवून थोपटले आणि सांगितले की जर नवीन उद्योगात काही अडचणी आल्या तर वेस्टिंगहाऊस चे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमीच खुले असतील.
तत्वनिष्ठ खांबेटे:
खांबेटे यांनी त्याच्या तत्त्वांचे पालन करत आपल्या आधीच्या कंपनीची कोणतीही उत्पादने कॉपी किंवा तयार न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने ठरवले की अलाईड प्रॉडक्ट्स उत्पादनासह प्रारंभ करायचा त्यानंतर नंतर काही “एर्मेटो फिटिंग्ज” आयात करायच्या. लघुउद्योग चालू केल्यावर थोड्याच अवधीत कोलकाता जवळील दोघेही डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स, वाराणसी आणि टाटा लोकोमोटिव्ह वर्क्स, जमशेदपूर येथून ऑर्डर येऊ लागल्या १९६३ ते १९६५ दरम्यान खांबेटे यांनी स्वउद्योग वाढी साठी खूप मेहनत घेतली.
सुरवातीला एस्केजी इंजिनीअर्स मध्ये एक मशीन होती नंतर एकेक सामील होत होत 10 मशीन झाल्या, हातात लाखो रुपयाच्या ऑर्डर्स देखील होत्या त्याकाळात लाखभर रुपये म्हणजे खूप चांगले होते. पण जेव्हा बाह्य जगाने घुसखोरी करण्यास सुरवात केली यावेळी कोलकातामध्ये मार्क्सवादी कम्युनिझम वाढू लागला होता. नवीन गुंतवणूक पश्चिम बंगाल मध्ये येणे बंद झाली होती येथील लहान लहान उद्योग देखील पश्चिम बंगाल मधून गाशा गुंडाळून बाहेर पळायला लागले .
आपल्या उद्योगाला सुगीचे दिवस असताना त्याच दरम्यान, आईवडील मुंबईच्या हद्दीजवळ ठाण्यात स्थायिक झाले,तिथे त्यांचे मामा राहत होते. त्यामुळॆ खांबेटे यांनी देखील ठाणे येथे जावे, याकरिता त्यांचे जवळचे मित्र श्री. म्हात्रे यांनी खांबेटे यांचे मन वळविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते की त्यांचे भविष्य आता ठाणे येथे आहे, जे त्या काळात भारताचे विकसनशील औद्योगिक केंद्र उदयास आले होते. तीन मित्रांनी मिळून कोलकाता येथे मे.एस के जी इंजिनीअर्स नावाने स्थापन केलेल्या भरभराटीस आलेल्या उद्योगातील भागीदारी खांबेटे यांनी जड अंतःकरणाने मागे घेतली आणि पुढील सूत्रे भागीदार श्याम सुंदर सिंग यांच्याकडे दिली. आता जरी श्याम सुंदर सिंग नसले तरी ही कंपनी आजपर्यंत सुरू आहे.
बंगाल ते ठाणे ह्या भारताच्या औद्योगिक भूमीत पुनःश्च उद्योजकतेची सुरवात
सुरुवातीला ठाण्यातील रहिवासी क्षेत्रातील उद्योगातून रेल्वेला काही सुट्या भागांचा पुरवठा आणि देखभाल करण्याचे काम चालूच होते ठाण्यात आल्यावर उद्योजक म्हणून खांबेटचे आयुष्य मात्र वाईट सुरू झाले भागीदाराने फसवणूक केली याचा परिणाम असा झाला की 2 वर्षांपर्यंत काहीही पैसे काढू शकला नाही., या कारणामुळे त्यांनी स्वतंत्र वेगळ्या वाटेवर जायचा मार्ग निवडला.
ठाणे येथे आशिया खंडातील सर्वात मोठ्या वागळे इंडस्ट्रियल इस्टेट येथे महाराष्ट्र वित्तीय महामंडळाकडून कर्ज घेतलेल्या दीड लाख रुपयात व १५०००रुपये उसनवार घेतलेल्या रकमेतून 500 चौरस मीटरचा भूखंड खरेदी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यांचे वडील रामकृष्ण यांच्या नावाने १९६९ मध्ये मे. रामसन इंजिनिअर्स ह्या नावाने कंपनी चालू केली सुरवातीला कंपनीत 16 ते १८ तास राबत होते त्यांचे एकच लक्ष होतं कि 50 लोकांना रोजगार द्यायचा आणि 3 शिफ्टमध्ये कारखाना या चालवायचा !
ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोशिएशन टीसाचा जन्म 1974/1975
सुरवातीला लघुउद्योग चालवताना उद्योजकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागायचे आणि लघुउद्योगांचा आवाज शासनापर्यंत पोचवण्यासाठी लघुउद्योजकांची संघटना नव्हती प्रश्न मात्र अनेक होते तेव्हा डॉ.मधूसूदन उर्फ अप्पासाहेब खांबेटे यांनी श्री वेद गुगलानी, कै. बी के गुप्ता, कै. रामन्ना श्रीनिवास, कै. पी नारायणन कै. आर व्ही दांडेकर ह्या ठाणे शहरातील 4 ते 5 छोट्या लघुउद्योजकाना बरोबर घेऊन ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोशिएशन टीसा ची स्थापना 1974 साली झाली आणि आजतागायत टीसा ने मागे वळून पाहिले नाही.
ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोशिएशनचा पसारा वाढत होता, संस्थेची स्वतःची वास्तू असावी ह्या साठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा कडे 1000 चौ.मी.मोफत प्लॉट ची मागणी करण्यात आली. परंतु एमआयडीसी ने मात्र रुपये 250 प्रति चौ.मी. दराने पैसे भरण्यास सांगितले हा दर त्या काळात न परवडणारा होता आणि रक्कम पण फार मोठी होणार होती जे संस्थेला त्या काळात शक्य नव्हते तेव्हा श्री खांबेटे ह्यांनी तत्कालीन उपमुख्य अधिकारी श्रीनिवास पाटील यांना सांगितले कि आम्ही उद्योगवाढी करीता, उद्योगां करिता एम आय डि सी चे काम करतो त्यामुळे संस्थेला मोफत प्लॉट मिळायला हवा, श्री श्रीनिवास पाटील म्हणाले कि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात तशी कायदेशीर तरतुद नाही, तेव्हा टिसा तर्फे श्री अप्पासाहेब खांबेटे ह्यांनी अगदी रोखठोकपणे म्हणाले कि तरतूद नसेल तर कायद्यात तरतूद करावी आणि आनंदाची गोष्ट अशी कि त्यावेळेस. श्रीनिवास पाटील कदाचित प्रभावित झाले असावेत, कारण पुढे १९८३ मध्ये 1 रुपया चौ.मी दराने टिसाला प्लॉट देण्यात आला! आणि तेव्हापासून महाराष्ट्रातील प्रत्येक एम आय डीसी विभागात १ रुपया चौ.मी ने प्लॉट देण्यास सुरवात झाली याचे श्रेय टिसाला जाते.
ठाणे लघुद्योग संघटनेची संपुर्ण टीम हा टीसा अश्वमेध आपल्या बरोबर घेऊन नेटाने काम करत आहे, ठाणे जिल्ह्यात उद्योग वाढ होण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी तसेच ठाण्याच्या विकासासाठी टीसा व टीम चे योगदान फार मोठे आहे, ठाणे शहराच्या इतिहासात डोकावून बघितले असता आपल्या लक्षात येइल की पहिली लघुउद्योग परिषद 1978 साली सेंट जॉन बाप्टिस्ट शाळेत आयोजित केली होते त्याची नोंद ठाण्याच्या इतिहासात आहे, याचा मान टीसाला जातो या परिषदेला तत्कालीन मंत्री श्री जॉर्ज फर्नांडिस, सुशीलकुमार शिंदे, भाऊसाहेब हिरे उपस्थित होते.
पूर्वी लोक म्हणायचे याला ठाण्यांत पाठवा कारण तेव्हा ठाणे शहराची ओळख ठाण्यात मेंटल हॉस्पिटल असल्यामुळे अशी होती.ठाणे मुंबईच्या वेशीवर असल्यामुळे त्याकाळी ठाण्यात रेमंड, कलर् केम, बोहरींगर, बायर , एशियन पेंट्स,गुडविल केमिकल, जे के, नेरॉलक पेंट , कॅडबरी, ,टेक्सन,बाँबे केमिकल, पिरॅमिल , ब्लुस्टार , एन आरबी बेरिंग , दलाल इंजि.सारखे कारखाने स्थापन झाले नंतरच्या काळात म्हणजे 1960साली आशिया खंडातील सर्वात मोठी *वागळे औद्योगिक वसाहत (एम आय डी सी च्या आधी स्थापन झाल्यावर येथे विंड्सर, बुश ,जॉन्सन टाईल्स ,फायबर ग्लास ब्रॅडमा ,एमको ,इंडियन रबर, पिसिपी कॅप्रीहन्स इत्यादी मोठे व मध्यम उद्योग स्थापन झाले त्यामुळे ठाणे शहरात मोठ्याप्रमाणात या उद्योगांना मशिनरी साठी लागणाऱ्या छोटया भागांचे उत्पादन करणारे हजारो छोटे छोटे अँसिलरी उद्दयोग ठाणे परिसरात उदयास आले याचा परिणाम शहरात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आणि ठाणे शहराची ओळख उद्योग नगरी म्हणून जगाच्या नकाशावर कोरली गेली
ठाणे शहरात छोट्या मोठ्या सुमारे 52 ओद्योगिक वसाहती असून त्यात अभियांत्रिकी , इलेक्ट्रॉनिक्स, उत्पादन तसेच माहिती तंत्रज्ञान सेवा देणारे उद्योग कार्यरत आहेत त्यातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. गेल्या दोन दशकात ठाण्यातील मोठे उद्योग बंद पडले काही उद्योग जिल्ह्यातील इतर ठिकाणी स्थलांतरित झाले त्यामुळे अत्यंत छोट्या उद्योगांना देखील काम मिळेनासे झाल्यामुळे त्यांना घर घर लागली असून अशा परिस्थितीत देखील लघुउद्योग कसे तरी तग धरून आहेत.
मध्यंतरी रेमंड कंपनी बंद झाल्यावर ठाणे लघु उद्योग संघटने तर्फे रेमंड च्या व्यवस्थापनास, मा. खासदार , महापालिका आयुक्त आय टु आर मान्य केल्यास रेमंडच्या 120 एकर पैकी 15 एकर जमिनीवर रेमंड अथवा जे के औद्योगिक वसाहत अशी ग्रीन इंजिनीअरिंग उद्योगांसाठी औद्योगिक वसाहत निर्माण करावी व 5 एकर चा बफर झोन निर्माण करावा जेणेकरून गृहप्रकल्प आल्यास देखील उद्योगांना बाधा पोचणार नाहीं ,मला आठवते ह्या प्रस्तावास पाठिंबा म्हणून ठाण्याचे खासदार श्री राजन विचारे यांनी तसे पत्र ठाणे महापालिकेला लिहिले होते परंतु दुदैवाने तसे झाले नाही.
उद्योगांना लागणारे कुशल कर्मचारी मिळण्यासाठी चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशनस् या अखिल भारतीय संस्थेच्या माध्यमातून ठाणे लघुउद्योग संघटना समाजातील गरीब व गरजू लोकांसाठी *मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम* राबवत असून आतापर्यत याचा लाभ हजारो तरुण तरुणींनी घेतला असून त्यातील काही लोकांनी आपले स्वयंरोजगार देखील चालू केले आहेत सदर प्रशिक्षण हे अव्याहतपणे चालू असून संस्थेचा को सीआ कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा मानस आहे आता पर्यंत संस्थेने आतापर्यंत सुमारे पाच हजारच्यावर लोकांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षित केले आहे परंतु शासनाकडून अद्याप जागा उपलब्ध होत नसल्या मूळे आमचे प्रयत्न तोकडे पडत आहेत संस्थेस नाम मात्र दरात जागा मिळाल्यास अनेक संशोधनपर व कौशल्य विकास कार्यक्रम यशस्वीरित्या राबविता येतील.. आम्ही सध्याच्या कोरोना काळात देखील ऑनलाईन पद्धतीने वस्तू व सेवाकरा सहित टॅलीचे प्रशिक्षण देत आहोत सध्या ठाणे ह्या उद्योग नगरीची डॉर्मीटरी होत आहे तसे होऊ नये यासाठी प्रशासनाने कसोशीने प्रयत्न करून रोजगार वाढीसाठी प्रोत्साहन देऊन प्रयत्न केले पाहिजेत ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेवर येणारा ताण कमी होईल व ठाण्यास गत वैभव प्राप्त होईल
चेम्बर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स (कोसिआ) चा जन्म १९९०
जिल्ह्यातील अथवा महाराष्ट्रातील उद्योगासाठी काम करत असतांना असे लक्षात आले कि लघुउद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील अडचणी अनेक आहेत परंतु लघुउद्योजकांची राष्ट्रीय संस्था नाही म्हणून कोसिआ म्हणजे चेम्बर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स ह्या लघुउद्योजकांच्या राष्ट्रीय शिखर संस्थेचा १९९० साली जन्म झाला .
1987 ते 1989 ह्या काळात क्लबिंग ऑफ इंडस्ट्री चे म्हणजे उद्योगांना एकत्र करून कराच्या जाळ्यात आणणे हे प्रश्न खूप होते. तेव्हा केंद्रीय मंत्री केंद्रीय उद्योगमंत्री श्री. वेंगल राव यांना भेटायला श्री खांबेटे अध्यक्ष टिसा ह्यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले तेव्हा क्लबिंग ऑफ इंडस्ट्री हा एकच मुद्दा होता परंतु मंत्र्यांनी बैठकीत स्थानिक संस्थेस पदाधिकाऱ्यांना दिलेल्या अल्प प्रतिसादामुळे लघु उद्योगांमध्ये असुरक्षितता निर्माण झाल्याने सर्वांनी एकमताने ठरवले की लघुउद्योजकांची सर्वमान्य राष्ट्रीय संस्था असावी त्यातूनच (कोसीआ) चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्सची स्थापना झाली.
आता पर्यंत कोसीआ च्या माध्यमातून चीन व सेनेगल ह्या देशात उद्योजकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व श्री खांबेटे ह्यांनी केले आहे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर औद्योगिक प्रदर्शनात भाग घेणे व व्हेन्डर डेव्हलपमेंट कार्यक्रम आयोजित करीत आहे ह्या शिवाय संपूर्ण देशात उत्तरपूर्व, पूर्व , दक्षिण, मध्य व पश्चिम क्षेत्रात प्रादेशिक स्तरावर लघुउद्योजकांच्या परिषद भरवून देशातील लघुउद्योजकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न कोसीआ करत आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार पर्यंत पोचवण्याचे काम करत आहे. केंद्र सरकारच्या लघुउद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय लघुउद्योग बोर्डावर कोसीआ ह्या राष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून डॉ खांबेटे यांची २०१२ते २०१४ दरम्यान निवड झाली होती .
वयाच्या पंचाहत्तरीत असतांना पहाटे तीन वाजल्याचा सुमारास शिकळकर गॅंग चे मोस्ट वॉन्टेड दरोडेखोर घर फोडण्यास आले होते परंतु खांबेटे ह्यांना सकाळी लवकर उठून व्यायाम करायची सवय असल्याने दरोडेखोरांचा घरफोडीचा नुसता प्रयत्न फसला नाही तर खांबेटे ह्यांनी तेल लावलेल्या पहिलवान प्रमाणे सराईत दरोडेखोरांशी दोन हात केले नंतर मुलाच्या मदतीने त्यांना पोलिसांच्या हवाली केले ह्या झटापटीत दरोडेखोरांनी खांबेटे ह्याच्या पाठीत ३ इंच खोल शिक खुपसल्याने जखम झाली होती , त्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तातर्फे विशेष सन्मान करण्यात आला होता व ठाणे महापालिकेने त्यांच्या कार्याबद्दल ठाणे भूषण पुरस्कार देऊन ठाणे महापालिके तर्फे गौरविण्यात आले होते .
मागे वळून बघतांना
वयाच्या नवद्दीत असतांना असे वाटते की मी पूर्णपणे समाधानी असून आयुष्याची 65वर्षे सार्वजनिक जीवनासाठी समर्पित करण्याच भाग्य हे फार कमी लोकांना मिळते.संपूर्ण भारतात पसरलेल्या लघुउद्योजक समुदायकडून आपुलकी, प्रेम आणि आदर मिळणे आणिज्यांचा तुम्ही विरोध करता त्यांच्याकडूनही प्रेम मिळते हे दुर्लभ आहे आणि तो दर्जा अजूनही खांबेटे राखून आहेत. प्रत्येक मनुष्याला त्याच्या योगदानाचे फळ मिळतेच तसे मधू खांबेटे ह्यांना आपुलकीने अप्पासाहेब म्हणून संबोधले जाते तर जवळच्या मित्रांसाठी ते मधु’च आहेत.
एक शल्य मात्र त्यांना कायमच खटकत आहे ते म्हणजे भ्रष्ट्राचार ते अजूनही गळ्यात भ्रष्टाचार हटाव चा बिल्ला गळ्यात अडकवून असतात. आज अनेक उद्योजक त्रास सहन करतात मात्र भ्रष्टाचारास मात्र थारा देत नाहीत परंतु हे सर्वांनी करणे गरजेचे आहे. तरच भ्रष्ट्राचाराची कीड नष्ट होईल .
सध्या गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असतांना येथील उद्योगांना देखील मोठा फटका बसला अनेक छोटे उद्योग तग धरू शकले नाही काहींनी कसेतरी आपले उद्योग पुढे चालू ठेवले व कोरोनाचा मुकाबला केला त्यातच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली ह्यावेळॆस मात्र परिस्थिती जास्त गंभीर असतांना देखील मागील वर्षाच्या अनुभवाच्या जोरावर
आरोग्य विभाग स्थानिक प्रशासनाने मोठ्या हिमतीने मात केली ,शासनाने देखील अर्थचक्र चालू कसे राहील यावर भर दिला. अगदी सफाई कामगारां पासून ते आरोग्य सैनिक, पोलिसांनी व इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी देखील मोलाचे सहकार्य केले ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने देखील ठाणे महापालिकेच्या माध्यमातून हजारो कामगारांच्या कोरोना टेस्ट टीसा मध्ये केल्या आणि संस्थेच्या माध्यमातून कोव्हीड योध्यासाठी ठाणे महापालिका ते सिव्हिल हॉस्पिटल येथे सॅनिटायझर्स, व सुमारे 75 हजार सर्जिकल मास्कचे वाटप
ठाणे महापालिका, एमआयडीसी , पोलीस स्टेशन्स , जिल्हाधिकारी कार्यालयास दिले, श्री छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे पेशंट्च्या सुविधे साठी स्टेनलेस स्टील देण्यात आले.तसेच पोलीस आयुक्तालयातील अनेक पोलीस स्टेशनचे वारंवार हायजीनायझेशन करण्यात आले. वागळे व काही पोलीस स्टेशन मध्ये शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर व कुलर बसवण्यात आले आणि ऑक्सिमीटर चे सुद्धा वाटप करण्यात आले. टिसा एवढ्यावरच थांबली नाही तर सुमारे 15000 लोकांना उत्तम तयार अन्नाचे वाटप करण्यात आले हे सर्व शक्य झाले आमच्या कमिटीने दिलेल्या प्रोत्साहनामुळे. .
श्री एकनाथ सोनवणे
It is very nicely described.