भारतीय टपाल विभागाचे डाक-पे (DakPay) अॅप्लिकेशन
भारतीय टपाल विभागाचे डाक-पे (DakPay) अॅप्लिकेशन
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि टपाल विभाग यांनी नवीन डिजिटल पेमेंट अॅप ‘डाक-पे’ (DakPay) लाँच केले आहे. आता या नवीन डिजिटल पेमेंट अॅपद्वारे बँकिंग आणि टपालच्या अन्य सेवाही एकाच अॅपवर वापरता येणार आहेत.
बायोमेट्रिकद्वारे कॅशलेस इकोसिस्टम तयार करण्यात अॅप मदत करेल. व्हर्च्युअल डेबिट कार्ड आणि यू पी आय च्या माध्यमातून कोणत्याही सेवा किंवा मर्चंटला पैसे पाठवता येणार.
‘DakPay’ या अॅपमध्ये डिजिटल पेमेंटसाठी क्यूआर कोड स्कॅन करण्याचा पर्याय आहे. ‘डाकपे’च्या माध्यमातून ग्राहक डॉमेस्टिक मनी ट्रान्सफर अर्थात डीएमटीद्वारे पैसे पाठवता येतील.
गुगल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड केल्यानंतर नाव, मोबाईल नंबर आणि पिन कोड टाकून अॅपमध्ये प्रोफाईल बनवावी. ४ अंकी पिन नंबर बनवावा लागेल.