नोव्हेंबर २०२१ मध्ये देशांतर्गत किरकोळ विक्रीत ९% ची वाढ I Retail sell Increased by 9% in November 2021 I
नोव्हेंबर २०२१ मध्ये देशांतर्गत किरकोळ विक्रीत ९% ची वाढ
नोव्हेंबर २०२१ मध्ये भारतातील किरकोळ विक्री नोव्हेंबर २०१९ मधील त्याच महिन्याच्या महामारीपूर्व पातळीच्या तुलनेत ९ टक्क्यांनी वाढली असून, ओमिक्रॉन प्रकाराचा प्रसार आणि साथीच्या आजाराच्या तिसऱ्या लाटेच्या चिंता असूनही व्यवसायात सुधारणा झाल्याचे संकेत देत आहेत, असे उद्योग संस्था रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे.
किरकोळ व्यवसायाच्या सर्वेक्षणात, रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने सांगितले की, गेल्या महिन्यात मागील वर्षी च्या तुलनेत १६% ची वाढ झाली आहे.सर्व विभागातील किरकोळ व्यवसायांनी महामारीपूर्व पातळीच्या तुलनेत विक्रीत वाढ दर्शविली आहे . नोव्हेंबर २०१९ च्या तुलनेत या वर्षी पश्चिम भारताने ११ टक्के वाढ दर्शविली आहे, त्यानंतर पूर्व आणि दक्षिण भारताने ९ टक्के वाढ दर्शविली आहे .तर उत्तर भारताने प्रत्येकी ६ टक्के वाढ दर्शविली आहे.
रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सीईओ कुमार राजगोपालन म्हणाले, “व्यवसायात सुधारणा होत आहे आणि आम्हाला आशा आहे की हि वाढ कायम राहील. तथापि, ओमिक्रॉन आणि तिसऱ्या लाटेभोवती अजूनही चिंता आहेत,परंतु सावध आशावाद आहे.
ग्राहकोपयोगी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये व्यवसायात वाढ झाली नसली तरीही खेळ साहित्य विभागात १८% ची वाढ झाली आहे. तर अन्नधान्य, सौंदर्यप्रसाधने, वेलनेस व पर्सनल केअर मध्ये वाढ झाली आहे
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo