नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करातून १.०४ लाख कोटींचा महसूल !
नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करातून १.०४ लाख कोटींचा महसूल !
नोव्हेंबर महिन्यात सरकारला वस्तू आणि सेवा करातून १.०४ लाख कोटींचा महसूल मिळाला आहे. ऑक्टोबर महिन्यात १.०५ लाख कोटी जीएसटी स्वरूपात मिळाले होते.
सलग दुसऱ्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर महसुलाने (GST Revenue Crossed 1 Lakh Crore in November) एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
८२ लाख जीएसटी रिटर्न सादर करण्यात आले ज्यामधून नोव्हेंबरमध्ये सरकारला जीएसटीतून १०४९६३ कोटी मिळाले आहेत. ज्यात सेंट्रल जीएसटीसाठी १९१८९ कोटी, स्टेट जीएसटीसाठी २५५४० कोटी, इंटिग्रेटेड जीएसटीसाठी ५१९९२ कोटी आणि सेसम्हणून ८२४२ कोटी मिळाले असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
नोव्हेंबर महिन्यात आयात केलेल्या वस्तूंवरील कर उत्पन्नात ४.९ टक्क्यांची वाढ झाली आहे.