डॉ अमित बागवे यांचा ‘इंटरनॅशनल चेंज मेकर अंडर ४०’ पुरस्काराने सन्मान !
डॉ अमित बागवे यांचा ‘इंटरनॅशनल चेंज मेकर अंडर ४०’ पुरस्काराने सन्मान !
अर्थसंकेतद्वारे महाराष्ट्रभर विविध आर्थिक साक्षरता तसेच उद्योजकीय कार्यक्रम करून उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य अव्याहतपणे करण्याच्या कार्याचा गौरव म्हणून ‘कॉमनवेल्थ सोसायटी फॉर इनोव्हेशन्स अँड रिसर्च तसेच ‘इंटरनॅशनल युथ सोसायटी’ द्वारे ‘इंटरनॅशनल चेंज मेकर अंडर ४०’ डॉ अमित बागवे यांचा सन्मान करण्यात आला आहे.
डॉ अमित बागवे यांनी गुंतवणूक तसेच उद्योजकता या विषयांवर ८ पुस्तके लिहिले आहेत. नुकतीच त्यांची ‘बिझनेसमेन्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’ या संस्थेच्या ‘मानद सल्लागारपदी’ नेमणूक झाली आहे.
‘अर्थ साक्षर पुरस्कार – प्रवास प्रेरणेचा’, ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’, ‘उद्योजकांची दिवाळी पहाट’, ‘नवं उद्योजक पुरस्कार सोहळा’, ‘डिजिटल इंडिया’, ‘अर्थ जिज्ञासा’, ;अर्थवेध – आर्थिक स्वराज्याची मुहूर्तमेढ’, ‘महाराष्ट्र गौरव’ अशा विविध कार्यक्रमांची संकल्पना त्यांनी मांडली व प्रत्यक्षात आणली. त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी सौ रचना बागवे यांचा सुद्धा हातभार लागला आहे.
डॉ अमित बागवे यांनी ‘सोशिअल मिडिया मार्केटिंग फॉर स्मॉल बिझनेस’ अर्थात लघु उद्योजकांसाठी सोशिअल मिडीयाचा वापर या विषयावर १०० हुन अधिक प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत. ज्याचा फायदा आज अनेक उद्योजक उचलत आहेत व त्यांच्या व्यवसायाला प्रशिक्षणाचा भरपूर फायदा होत आहे.
START UP या विषयावर दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर संपादक डॉ. अमित बागवे यांची मुलाखत झाली असून आकाशवाणीवर सुद्धा त्यांच्या अनेक मुलाखती घेण्यात आल्या आहेत. अनेक प्रादेशिक वृत्तपत्र तसेच वृत्तवाहिन्यांद्वारे डॉ अमित बागवे यांची मुलाखत घेण्यात आली आहे.
पहिला ‘जागतिक मराठी उद्योजकता दिवस’ वर्ष २०१९ मध्ये सुरु करण्यात आला… या कार्यक्रमामध्ये ‘महाराष्ट्रातील प्रमुख उद्योजकीय संस्था’ म्हणून ‘अर्थसंकेतचा’ सन्मान करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क ८०८२३४९८२२