टाटा ग्रुप बनवणार UPI पेमेंट अँप I Tata Group to Launch UPI Payment Soon I
टाटा ग्रुप बनवणार UPI पेमेंट अँप
टॉप डिजिटल पेमेंट अँप अमेझॉन, गूगल पे , फोन पे यांना भारतातील सर्वात प्रसिद्ध ब्रँड टाटा ग्रुप कडून नवा स्पर्धक निर्माण होणार आहे कारण टाटा ग्रुप स्वतःचे युपीआय पेमेंट अँप बनविणार आहे. टाटा ग्रुप या करिता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून परवाना मिळवण्याकरिता कार्यरत आहे. थर्ड पार्टी डिजिटल पेमेंट सर्विस प्रोव्हायडर म्हणून ते काम करतील. टाटा डिजिटल या डिजिटल कॉमर्स युनिट माध्यमातून UPI इन्फ्रास्ट्रक्चर साठी आयसीआयसी आय बँकेसोबत कंपनी भागीदारी करणार आहे. तसेच खाजगी क्षेत्रातील प्रख्यात बँकर यांच्यासोबत देखील बँकिंग पार्टनर करिता बोलणी सुरु आहेत. UPI व्यवहारांत सध्या फोन पे , गूगल पे आघाडीवर असून अमेझॉन पे, पे टीएम, व्हाट्सअप पे हे देखील आघाडीवर आहेत. टाटा डिजिटल त्यांचे टाटा न्यूओ हे सुपर अँप पुढील महिन्यात लॉन्च करणार आहे. या क्षेत्रात येणाऱ्या नवीन कंपन्यांना एकूण UPI ट्रान्सक्शन पैकी पहिल्या ३ महिन्यांकरिता केवळ ३०% व्यवहार प्रोसेस करण्याची परवानगी NPCI कडून असते.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
