टाटा कम्युनिकेशनला निव्वळ नफ्यात २८% ची वाढ I Tata Communications profit rises by 28% I
टाटा कम्युनिकेशनला निव्वळ नफ्यात २८% ची वाढ
टाटा कम्युनिकेशन ने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात २७.८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३९५.२१/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ३०९.४१/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. डेटा बिझनेस , डिजिटल प्लॅटफॉर्म , सोल्युशन्स मधून उत्पन्नात वाढ झाली असून कंपनी नाविन्यपूर्ण सेवा प्रदान करण्यास प्रयत्नशील आहे. या तिमाहीत एकूण उत्पन्न घटले असून हि रक्कम रु. ४२०३.६९/- करोड आहे. महसूल व नफा वाढ यामुळे कंपनीला आर्थिक स्थिरता आली आहे. कंपनी भविष्यात वाढीसाठी गुंतवणूक करणार आहे. कंपनीने व्हर्चुअल नेटवर्क ऑपरेटर लायसेन्स मिळवले असून या तिमाहीत कंपनीने रु.४००/- करोड चा भांडवली खर्च केला आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo