कोल इंडियाला रु. ४५५८/- करोड नफा I Coal India profit of Rs. 4558/- Crore I
कोल इंडियाला रु. ४५५८/- करोड नफा
कोल इंडियाला तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ४८% ची वाढ
राज्य मालकीच्या कोल इंडिया लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ४७.७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४५५८.३९/- करोड आहे. महसुलात वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३०८५.३९/- करोड होती. या तिमाहीत ऑपरेटिंग महसुलात वाढ झाली असून रु.२८,४३३.५०/- करोड आहे. एकूण खर्चात वाढ झाली असून हि रक्कम रु. २२,७८०.९५/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १९५९२.५७/- करोड होती. देशांतर्गत मागणीच्या ८०% कोल पुरवठा कोल इंडिया कंपनीमार्फत केला जातो. कोळसा उत्पादनात या तिमाहीत वाढ झाली असून एकूण १६२.८३ मिलियन टन आहे
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo