ओलेक्ट्रा ग्रीनटेकला सरकारी परिवहन प्राधिकरणाकडून ५० ई-बसचे काम I Olectra Greentech received order for 50 E Bus I
ओलेक्ट्रा ग्रीनटेकला सरकारी परिवहन प्राधिकरणाकडून ५० ई-बसचे काम
ओलेक्ट्रा ग्रीनटेक, देशातील सर्वात मोठी हैदराबाद मधील इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनीने सोमवारी सांगितले की, केंद्र सरकारच्या FAME अंतर्गत “राज्य परिवहन प्राधिकरणांपैकी एक” कडून ५० ई-बससाठी पुरस्काराचे पत्र मिळाले आहे. या बसेस १२ महिन्यांत वितरित केल्या जाणार आहेत, असे कंपनीने सांगितले.
“ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड आणि एवेय ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड यांना ३५३ बसेससाठी कमीत कमी बोली लावणारे (L-1) म्हणून घोषित करण्यात आलेल्या निविदांपैकी; ५० इलेक्ट्रिक बससाठी, एवेय ला राज्यापैकी एकाकडून पुरस्काराचे पत्र मिळाले आहे.” ऑलेक्ट्रा ग्रीनटेकने फाइलिंगमध्ये म्हटले आहे.एवेय ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड ही ओलेक्ट्रा ग्रीनटेक ची उपकंपनी आहे.
“५० ई-बसच्या पुरवठ्यासाठी हा करार १२ वर्षांच्या कालावधीसाठी आहे . मेंटेनन्स चे काम देखील या कालावधीत केले जाईल”
या कराराची किंमत सुमारे १२५ कोटी रुपये आहे.
इलेक्ट्रिक बसेससाठी ऑलेक्ट्राची एकूण ऑर्डर बुक १५२३ ई-बसची आलेली आहे.असे कंपनीने म्हटले आहे.
ओलेक्ट्रा ग्रीनटेक हि कंपनी मेघ इंजिनीअरिंग अँन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चा एक भाग असून , चीनच्या सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी बिव्हायडी च्या तांत्रिक सहाय्याने त्यांनी बसेस विकसित केल्या आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo