महागाई दराने गाठला उच्चांक I Inflation on Rise I
महागाई दराने गाठला उच्चांक
अन्नधान्य किमतीत वाढीमुळे भारतात मार्च मध्ये महागाई दराने गाठला उच्चांक
भारतात मार्च महिन्यात रिटेल इन्फ्लेशन मागील १६ महिन्याच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे ६.३५% झाले आहे. अन्नधान्य किमतीत मागील ३ महिन्यांत सातत्याने वाढ झाल्याने या किमती वाढल्याचे कंपनीने सांगितले. कंझ्युमर प्राईस इंडेक्स मध्ये हा दर मोजला जातो. हा दर फेब्रुवारी महिन्यात ६.०७% होता. नोव्हेंबर २०२० पासून हा दर मार्च २०२२ मध्ये सर्वाधिक नोंदवला गेला. रशिया – युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून तेल व फर्टीलायझर च्या निर्यातीत अडथळे निर्माण झाले आहेत. पाम ऑइल च्या किमती या वर्षी ५०% ने वाढल्या असून पँडेमिक मुळे उत्पन्नात घट व अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. शुक्रवारी RBI ने रेपो रेट मध्ये बदल न करता सर्वाधिक कमी म्हणजे ४.०% वर स्थिर केला होता.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo