ब्रँड म्हणजे – ऍडव्होकेट मनाली चिटणीस
ब्रँड म्हणजे – ऍडव्होकेट मनाली चिटणीस ⓒ अर्थसंकेत
अर्थसंकेत लॉकडाऊन विशेष !
अर्थसंकेत – मराठी माणसाचा खरा मित्र !
ऍडव्होकेट मनाली चिटणीस यांनी वर्ल्ड इंटलेक्चुअल प्रॉपर्टी डेच्या निमित्ताने अर्थसंकेत मार्फत मार्गदर्शन केले.
आता आपण काही ब्रॅण्ड बघूया. जसे आपल्याला काय खरेदी करायचे असल्यास आपण अमेझॉन वेबसाईटला जातो. यामध्ये नावाखाली ए टू झेड ला एक एरो दाखवला आहे. याचा अर्थ या वेबसाईट वर तुम्ही ए टू झेड पर्यंतचे सर्व प्रॉडक्ट खरेदी करू शकता असा त्याचा अर्थ होतो. ⓒ अर्थसंकेत
प्रत्येक ट्रेडमार्कला एक स्टोरी असते. डोमिनोज एक डॉट व त्यापुढे दोन नंतर तीन असे डॉट ची संख्यावाढ होते आहे असे दाखवले आहे. म्हणजेच त्यांच्या एका आउटलेट ने पुढे अनेक फ्रेंचायसी निर्माण केल्या हे त्यांना सूचित करायचे असते. या पद्धतीने तुम्ही देखील कल्पकता वापरून तुमचा ट्रेडमार्क बनवू शकता . ⓒ अर्थसंकेत
काही व्यवसायात त्यांच्या पिढ्यान पिढ्या खूप कष्ट करून तो ब्रँड नावारूपास आणतात. परंतु पुढील पिढीला मात्र तो व्यवसाय वाढवण्यास इच्छा नसते . अशावेळी ते कुटुंब बिझनेस बंद करते पण असे न करता आपण त्या ब्रँडचे व्हॅल्युएशन करू शकतो. यामध्ये तुमच्या ब्रँडचे मूल्यांकन केले जाते व तुमच्या ब्रँड ला विकत घेण्याकरिता देखील अनेक जण उत्सुक असतात. कारण त्याची ओळख तयार झालेली असते. ⓒ अर्थसंकेत
तुम्ही तुमचा व्यवसाय दुसऱ्यास विकला तर ते प्रॉडक्ट मार्केट मध्ये राहते .याच पद्धतीने आमची शाखा कुठेही नाही असे देखील आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो आता ही पद्धत खूप जुनी झाली आहे. ⓒ अर्थसंकेत
आता तुम्ही एका क्लिकवर तुमचे प्रोडक्ट अनेक ठिकाणी विकू शकता. तुमचे प्रोडक्ट तुम्हाला विविध ठिकाणी विकायचे असेल तर तुम्ही फ्रेंचायसी मॉडेल करू शकता. यासाठी तुम्हाला ट्रेडमार्क रजिस्टर असणे गरजेचे आहे .त्यावर तुम्हाला रॉयल्टी मिळते . ⓒ अर्थसंकेत
आता आपण कॉपीराईट विषयी जाणून घेऊया. तुम्ही जर आर्टिस्ट , फोटोग्राफर, पेंटर, राईटर असाल तर तुम्ही तुमच्या सर्व क्रिएटिव्ह गोष्टींचे कॉपीराइट घेऊ शकता .तसेच तुमची वेबसाईट, मोबाईल ॲप देखील तुम्ही कॉपीराइट करू शकतात. ⓒ अर्थसंकेत
त्यानंतर येते ते पेटंट . बऱ्याचदा ट्रेडमार्क व पेटंट मध्ये गफलत होते .कोणतेही रीसर्च ,नवीन शोध जो पूर्वी अस्तित्वात नव्हता. असा लावलेला शोध याकरिता तुम्ही पेटेंट घेऊ शकता. त्यानंतर डिझाईन ॲप्लिकेशन म्हणजे कोणतेही प्रॉडक्ट ज्याला टू किंवा थ्री डायमेन्शन फिगर असते. त्याचे डिझाईन ॲप्लीकेशन होते. ⓒ अर्थसंकेत
जसे एखाद्या बॉटलचा आकार, मोबाईलचे एखादे स्ट्रक्चर यासाठी तुम्ही डिझाईन ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर जिओग्राफिकल रेफरन्स बद्दल आपण जाणून घेऊ. ⓒ अर्थसंकेत
कोणतेही प्रॉडक्ट जिओ ग्राफिकल रेफरन्स देते, जसे कोल्हापुरी चप्पल, पुणेरी पगडी या गोष्टींचा त्या-त्या जिओ ग्रा फिकल एरिया शी संबंध असतो.त्यावेळी तुम्ही जिओग्राफिकल रेफरन्स घेऊ शकता. ⓒ अर्थसंकेत
इंटलेक्चुअल प्रॉपर्टी हि तुमची असेट असते. तिला आपण प्रोटेक्ट केले पाहिजे व वेळोवेळी त्याचे व्हॅल्युएशन केले पाहिजे.याप्रमाणे इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईटचा फायदा कसा करावा याचा विचार प्रत्येकाने नक्की करावा. ⓒ अर्थसंकेत
अर्थसंकेत – मराठी उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ !
#BusinessWillGrow #Arthsanket