एल अँड टी इन्फोटेकला दुसऱ्या तिमाहीत रु.५५१.७/- करोड नफा I L & T Infotech 551.7/- crore profit I
एल अँड टी इन्फोटेकला दुसऱ्या तिमाहीत रु.५५१.७/- करोड नफा
एल अँड टी इन्फोटेकला दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात २०.८% ची वाढ तर महसूल २५.६% ने वाढला
कंपनीने प्रति शेअर १५ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला.
आयटी सेवा कंपनी लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (LTI) ला आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा २०.८ % ने वाढून हि रक्कम रु.५५१.७/- करोड आहे.तर एकत्रित महसूल २५.६ %ने वाढून रु. ३७६७/- करोड आहे.
व्याज आणि कर आधी कमाई (EBIT) मार्जिन१७.२% आहे. आतापर्यंतचा सर्वोत्तम तिमाही अहवाल नोंदवण्यास आम्हाला आनंद होत आहे.असे एलटीआयचे मुख्य कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालक संजय जलोना म्हणाले.कंपनीने $२ अब्ज वार्षिक महसूल वाढ केली आहे.
कंपनीच्या एकूण व्यवसायात बँकिंग आणि विमा विभाग जवळजवळ निम्मा वाटा उचलतो.तिमाहीत बँकिंग आणि वित्तीय सेवा विभागात ९.९% ची वाढ तर विमा व्यवसाय सेवा विभाग ५.६% ने वाढला. या विभागांचा एकूण महसूलात ४६.७ % वाटा आहे. तिमाहीत उत्पादन विभाग १२.४% ने वाढला.
भौगोलिक दृष्टीने, उत्तर अमेरिका कार्यक्षेत्रात या तिमाहीत ८.९% ची वाढ तर युरोप ५.१ टक्क्यांनी वाढला.
जोरदार मागणी व पुरवठ्याच्या दृष्टीने प्रगती करण्यास आम्ही एकूण कर्मचारी संख्या ३१% ने वाढवली आहे.असे जळोन म्हणाले.
दुसऱ्या तिमाहीत, $५० दशलक्ष श्रेणीत एक ग्राहक, $२० दशलक्ष श्रेणीमध्ये तीन ग्राहक आणि $१० दशलक्षांच्या यादीत पाच ग्राहक जोडले गेले आहेत.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R