WhatsApp पेमेंट सुविधेला सुरूवात
WhatsApp पेमेंट सुविधेला सुरूवात
स्टेट बँक, एच डी एफ सी बँक, आय सी आय सी आय आणि ऍक्सिस बँक या चार बँकांच्या मदतीनं WhatsApp पेमेंट सुविधेला सुरूवात झाली आहे. WhatsApp च्या माध्यमातून आता संदेशांसह पैसेदेखील पाठवता येणार आहेत.
WhatsApp पे ही सुविधा, गुगल पे, फोन पे, भीम आणि अन्य बँकांच्या अॅपप्रमाणेच युपीआयद्वारे कार्यरत आहे. यासाठी कोणत्याही व्यक्तीला वॉलेटमध्ये पैसे ठेवण्याची गरज नाही. युझर्सना थेट आपल्या बँक खात्यातून पैसे देता येणार आहेत.
जेव्हा एखादा युझर या सेवेसाठी नोंदणी करेल तेव्हा WhatsApp द्वारे त्याचा एक आयडी तयार करण्यात येईल. अॅपच्या पेमेंट्स सेक्शनमध्ये जाऊन हा आयडीदेखील पाहता येऊ शकतो. WhatsApp Payments द्वारे ज्या व्यक्तीकडे युपीआय आहे त्यांना पैसे पाठवता येणार आहे.