अर्थसंकेत ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’ पर्यटन विशेष कार्यक्रम संपन्न
अर्थसंकेत ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’ पर्यटन विशेष कार्यक्रम संपन्न
देशाच्या प्रगतीमध्ये पर्यटन व्यवसायाचा महत्वाचा वाटा – श्री. एग्नेलोराजेश अथायडे
मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
अर्थसंकेत ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’ पर्यटन विशेष कार्यक्रम १२ मार्च रोजी कोहिनुर बिझनेस स्कुल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्राच्या विविध भागांतून पर्यटन संस्था यात सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्रातील हजारो पर्यटन संस्थांपैकी फक्त नऊ संस्था बनू शकल्या ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’. ट्युलिप हॉलिडेज, खवणे कयाक्स, दीपक वर्ल्ड व्हेकेशन्स ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’ ठरले. बेसिल लीफ हॉलिडेज, जोगळेकर कॉटेज, शिवांजली हॉलिडे होम, राजगुरू टूर्स बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड ठरले. ईशा टूर्स आणि फ्लाईंग कोकण मोस्ट इन्नोव्हेटिव्ह ब्रँड ठरले.
अर्थसंकेतचे काम म्हणजे अप्रसिद्ध लोकांना प्रसिद्ध करणे, प्रसिद्ध लोकांना सुप्रसिद्ध करणे आणि सुप्रसिद्ध लोकांना सर्व सामान्यांसमोर आणणे हे आहे. जाहिरात, मार्केटिंग, ब्रॅंडिंग सातत्याने करणे गरजेचे आहे, कारण ज्यावेळेला ग्राहकाला वस्तू अथवा सेवा हवी असेल, तेव्हा आपले नाव त्याच्यासमोर येणे आवश्यक आहे. ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’ संकल्पनेमध्ये सहभागी ब्रँडचे सोशिअल मीडियाच्या माध्यमातून सात दिवस व्होटिंग घेतले जाते. व्होटिंगनंतर जास्त व्होट मिळालेल्या विभागात पुरस्कार दिला जातो. असे अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना सांगितले.
कोहिनुर बिझनेस स्कुलच्या संचालिका डॉ. स्वेतलाना तातूस्कर यांनी संस्थेच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कोहिनुरच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
पाणी, डोंगर आणि बर्फ असे सर्व काही भारतमध्ये असल्यामुळे, भारतात मोठ्या प्रमाणात पर्यटन सुरु आहे. भारतमध्ये महाकुंभ आहे आणि चायनाकडे महाकुंभ नाही. भारत देशामध्ये संपूर्ण जगाचे प्रतिबिंब बघता येते व भारत इतर देशांवर फार कमी अवलंबून आहे. पर्यटनामुळे कोणत्याही राज्याला सातत्यपूर्ण उत्पन्न मिळते असेही ते म्हणाले. महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास १३ कोटी आहे, जगामधील अनेक देशांची लोकसंख्या इतकी नाही, त्यामुळे नुसते महाराष्ट्रात जरी पर्यटन विकासावर भर दिला, तरी खूप मोठी आर्थिक उलाढाल होऊ शकते. पर्यटनामुळे आयुष्यात बरेच काही शिकता येते. प्रवासात भेटणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकवत असते. असे मत ग्लोबल सेंट अँजेलो ग्रुपचे सर्वेसर्वा श्री. एग्नेलोराजेश अथायडे यांनी मांडले.
एजिलस डायग्नोस्टीक्सचे संस्थापक डॉ. अविनाश फडके हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठी माणूस खूप उत्तमरीत्या व्यवसाय करू शकतो हे त्यांनी उदाहरणासह उपस्थितांना सांगितले. मराठी माणसाने देशावर राज्य केले आहे. युद्ध लढण्याची जोखीम घेतली आहे. मराठी माणूस जोखीम घेऊ शकतो व त्याने उद्योग व्यवसायात जोखीम घेऊन पुढे गेले पाहिजे. लघु व मध्यम उद्योग शेअर बाजारात लिस्ट करून भांडवल उभे करून व्यवसाय मोठे केले पाहिजेत, असे ते म्हणाले.
मराठी माणूस शिक्षण घेतो, नोकरी करतो, त्यात सुद्धा फार प्रगती करत नाही व शेवटी निवृत्त होतो. उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांच्या नियमांचे अनुपालन करायला मराठी उद्योजक कमी पडताना दिसतात, असे विचार वस्तू व सेवा कर उपायुक्त श्री. चैतन्य ताथारे यांनी मांडले.
जेष्ठ अभिनेत्री व लेखिका व न्यूज स्टोरी टुडेच्या निर्मात्या सौ. अलका भुजबळ कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम करणाऱ्यांना प्रसिद्धी देण्याचे काम न्यूज स्टोरी टुडे द्वारे केले जाते. पर्यटन व्यवसाय करणाऱ्या महिलांचा सुद्धा सत्कार केला जावा असे मत त्यांनी मांडले.
महाराष्ट्रातील हजारो पर्यटन संस्थांपैकी फक्त नऊ संस्था बनू शकल्या ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’. ट्युलिप हॉलिडेज, खवणे कयाक्स, दीपक वर्ल्ड व्हेकेशन्स ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’ ठरले. बेसिल लीफ हॉलिडेज, जोगळेकर कॉटेज, शिवांजली हॉलिडे होम, राजगुरू टूर्स बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड ठरले. ईशा टूर्स आणि फ्लाईंग कोकण मोस्ट इन्नोव्हेटिव्ह ब्रँड ठरले.
‘आयकॉनिक टुरिझम ब्रँड ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्काराने ‘वेदभुमी इको व्हिलेज’चा सत्कार करण्यात आला. वेदभूमी इको व्हिलेज हे ५१ एकरचे शाश्वत राहण्याचे ठिकाण आहे. ९ ग्रहांच्या एका अनोख्या थीमभोवती डिझाइन केलेले, वेदभूमी शाश्वतता, कल्याण आणि सांस्कृतिक वारसा यांना एका तल्लीन करणाऱ्या अनुभवात एकत्रित करते. वेदभूमी इको व्हिलेजचे उद्दिष्ट एक सुसंवादी जीवनशैली निर्माण करणे आहे जिथे निसर्ग आणि आधुनिक सुविधा एकत्र राहतात, व्यक्ती, कुटुंबे आणि गुंतवणूकदारांना प्रीमियम शेती जमीन, बुटीक कॉटेजची मालकी घेण्याची किंवा निसर्गाच्या सान्निध्यात एक नवोदित अल्पकालीन मुक्काम करण्याची संधी प्रदान करते.
ट्युलिप हॉलीडेजला जवळपास २० वर्षे पूर्ण झाली आहेत व देशी व परदेशी पर्यटन करणाऱ्या ‘ट्युलिप हॉलीडेज’चे आज ७५,००० हून अधिक समाधानी आणि आनंदी प्रवासी आहेत. पाहुण्यांचे समाधान हे ट्युलिप हॉलीडेजचे बोधवाक्य आहे.
‘दीपक वर्ल्ड वेकेशन’ची स्थापना २०११ साली झाली असून मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, थायलंड, मौरीशस अशा विविध ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत. ‘दीपक वर्ल्ड वेकेशन’ची खासियत म्हणजे बजेट पासून प्रीमियम पर्यत सर्व पॅकजेस त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
बेसिल लीफ हॉलीडेला १६ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांचे उद्दिष्ट वैयक्तिकृत आणि उच्च दर्जाच्या प्रवास सेवा देणे हे आहे. सुरुवातीला त्यांनी भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांवर लक्ष केंद्रित केले, पण नंतर आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रातही प्रवेश केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वेंगुर्ले तालुक्यामधल्या खवणे गावातील २० वर्षांचा तरुण रोहन परब व त्याच्या भावांनी महाराष्ट्रात कयाकिंगचे नवे पर्व सुरु केले. खवणे गावाच्या निसर्गरम्य मॅंग्रोव्ह जंगलात कयाकिंग केले जाते. जिथे १-२ किमीचा सुंदर प्रवास असतो. त्यांनी काही खास गुप्त ठिकाणं पर्यटकांसाठी खुली केली आहेत.
ईशा टूर्सला २२ वर्ष पूर्ण झाली आहेत. ५० हजाराहून अधिक आनंदी पर्यटकांची त्यांना साथ लाभली आहे. भारतातील लडाख,आसाम,मेघालय,अरुणाचल प्रदेश, नागालँड, स्पिती व्हॅली, ऑफबीट हिमाचल, भूतान सह जगातील आशिया, युरोप, आफ्रिका खंडांतील ४५ देशांत विविध हटके सहलींचे आयोजन त्यांनी केले आहे. ‘True Friend of Ladakh’ हा लडाख टुरिझम चा पुरस्कार, Pioneer in Indian Tourism Market हा Borneo Tourism कडून पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
शिवांजली हॉलिडे होमची सुरुवात २००५ साली अलिबाग येथील आवास या गावात झाली. शिवांजली हॉलिडे होम मांडवा जेट्टी पासून १० मिनिटांच्या अंतरावर आहे तसेच आवास बीच चालत ५ मिनिटांवर आहे. इथे घरगुती कोकणी पद्धतीचे उत्कृष्ट शाकाहारी आणि मांसाहारी जेवण मिळते. शिवांजली हॉलिडे होम हे असे ठिकाण आहे जिथे संपूर्ण कुटुंब सुट्टीची मजा घेऊ शकते. चवदार जेवण, स्वच्छ सुंदर खोल्या आणि स्विमिंग पूलसाठी शिवांजली हॉलिडे होम प्रसिद्ध आहे.
जोगळेकर कॉटेज ही पर्यटकांना राहण्याचा अनोखा अनुभव देणारे अलिबागमधील एक ठिकाण आहे. नयनरम्य जागी स्थित हे कॉटेज निसर्ग प्रेमी, स्टारगेझिंग आणि पर्यटकांसाठी एक सुयोग्य पर्याय आहे. उत्कृष्ट व चवदार जेवणासह अलिबागचा सर्वोत्तम अनुभव देणारे जोगळेकर कॉटेज, नयनरम्य लँडस्केपमध्ये वसलेले आहे. स्विमिंग पूल, रेन डान्स तसेच विविध खेळ खेळण्याची सोय इथे उपलब्ध आहे. डेस्टिनेशन वेडिंग तसेच कौटुंबिक व उद्योजकीय कार्यक्रमांसाठी कॉन्फरन्स हॉल सुद्धा इथे उपलब्ध आहे.
मध्यमवर्गीय पर्यटकांसाठी स्थापन झालेल्या ‘राजगुरु टूर्स’ला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. पर्यटकांच्या प्रेम आणि विश्वासामुळे देश विदेशात ७५० हुन अधिक सहली त्यांनी आयोजित केल्या आहेत. २२,००० हुन अधिक पर्यटकांना सेवा देणाऱ्या ‘राजगुरु टूर्स’ची खासियत म्हणजे माफक किंमतीत उच्च दर्जा व उत्कृष्ट नियोजन. जिव्हाळा जपणारी माणसं ही ‘राजगुरु दुर्स’ची Tagline आहे. ज्येष्ठांची व लान मुलांची काळजी हा राजगुरु टूर्सचा खासियत आहे.
फ्लाइंग कोकण देवगड झिपलाइन ही भारताच्या किनारपट्टीवरील अशा प्रकारची पहिली साहसी क्रीडा उपक्रम आहे. वैष्णवी जोईल आणि श्रीकांत जोईल या भावंडांनी भारताला एक अनोखा साहसी उपक्रम म्हणून कोस्टल झिपलाइनिंगची ओळख करून दिली आहे. फ्लाइंग कोकणच्या देवगड येथील झिपलाइनचे लोकेशन खूपच छान आहे.. हे देवगड समुद्रकिनारी आहे.. देवगड समुद्रकिनाऱ्याच्या नयनरम्य दृश्यासह झिपलाइनचा थरार घेण्यात खरी मजा आहे.
श्री. मंदार नार्वेकर यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले व रचना आर्टस् अँड क्रिएशन्सच्या संस्थापिका सौ. रचना लचके बागवे यांनी आभार प्रदर्शन केले.
अर्थसंकेत ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’ (पर्यटन विशेष) व्होटिंगला भरघोस प्रतिसाद मिळाला. हजारो लोकांनी व्होटिंग केले. पर्यटकांनी त्यांच्या पर्यटन संस्थांवरचे प्रेम दाखवले. व्होटिंग करणाऱ्यांना अर्थसंकेततर्फे डॉ अविनाश फडके यांच्या हस्ते गिफ्ट देण्यात आले.
नॉलेज पार्टनर- कोहिनूर मॅनेजमेंट स्कूल
रेडिओ पार्टनर- मॅजिक १०६.४ एफएम
मीडिया पार्टनर- प्लॅनेट मराठी
असोसिएट पार्टनर- अलिबाग अॅग्रीकल्चर टुरिझम डेव्हलपमेंट सोसायटी, रायगड
सहकारी संस्था – पवित्र विवाह, एल के क्रिएशन्स, रचना आर्टस् अँड क्रिएशन्स, युनायटेड मराठी उद्योजक ग्लोबल, ट्रॅव्हल संकेत, अर्थसंकेत ग्लोबल न्यूज, राजापूर तालुका शेतकरी उप्तादक कंपनी