EPFO ऑक्टोबर मध्ये १२.७३ लाख नवीन खाते I EPFO 12.73 New Accounts I

EPFO ऑक्टोबर मध्ये १२.७३ लाख नवीन खाते

रिटायरमेंट फंड व्यवस्थापन संस्था ईपीएफओने ऑक्टोबरमध्ये १२.७३ लाख निव्वळ ग्राहक जोडले आहेत, जे गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत १०.२२% ने वाढले आहेत. जोडलेल्या एकूण १२.७३ लाख निव्वळ सदस्यांपैकी ७.५७ लाख नवीन सदस्यांची EPF आणि MP कायदा, १९५२ अंतर्गत प्रथमच नोंदणी झाली आहे.

अंदाजे ५.१६ लाख निव्वळ सदस्य बाहेर पडले परंतु EPFO मध्ये त्यांनी त्यांचे सदस्यत्व चालू ठेवण्याचा पर्याय निवडून EPFO मध्ये पुन्हा सामील झाले आणि अंतिम पैसे काढण्याचा पर्याय निवडण्याऐवजी त्यांचे पीएफ जमा मागील ते वर्तमान पीएफ खात्यात हस्तांतरित केले आहे .

वेतनश्रेणी डेटाची वयोनिहाय तुलना दर्शविते की, २२ ते २५ वर्षे वयोगटाने ऑक्टोबर २०२१ मध्ये ३.३७ लाख जोडण्यांसह सर्वाधिक निव्वळ नोंदणी केली आहे.
१८ ते २१ या वयोगटातही सुमारे २.५० लाख निव्वळ नावनोंदणीं झाली आहे. १८ ते २५ वयोगटात ऑक्टोबर २०२१ मध्ये एकूण निव्वळ ग्राहकांच्या वाढीमध्ये सुमारे ४६.१२ टक्के योगदान झाले आहे. या वयोगटातील सदस्य सामान्यतः नव्याने नोकरीला लागले आहेत.

पगाराच्या आकडेवारीची राज्यवार तुलना ठळकपणे दर्शवते की, महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक हि राज्ये आघाडीवर असून या प्रदेशातून महिन्याभरात ७.७२ लाख ग्राहक जोडले आहेत.

उद्योग-निहाय वेतनश्रेणी डेटा सूचित करते की ‘तज्ञ सेवा’ श्रेणी (मनुष्यबळ एजन्सी, खाजगी सुरक्षा एजन्सी आणि लहान कंत्राटदार इत्यादींचा समावेश आहे) या महिन्यात एकूण सदस्य जोडणीच्या ४०.७३% आहे. याशिवाय, कागद, तांदूळ मिलिंग, वित्तपुरवठा आस्थापना इत्यादी उद्योगांचा समावेश आहे.

EPFO त्यांच्या सदस्यांना निवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधी, पेन्शन लाभ आणि सदस्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कौटुंबिक निवृत्ती वेतन आणि विमा लाभ प्रदान करते.

EPFO oct
EPFO oct

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *