Breaking News Share Market Iशेअर मार्केट ताज्या बातम्या २४ फेब्रुवारी २०२१

शेअर मार्केट महत्वाच्या बातम्या !

  1. अशोक लेलँडच्या व्यवसायात वाढ !

अशोक लेलँडच्या व्यवस्थापनाने टिप्पणी केली की, कंपनीच्या डिजिटल पुढाकारांमुळे गाड्यांचा ताफा असणाऱ्या मालकांना १५% खर्चांची बचत झाली आहे.

२०१७ पासून इंधन बचत ५% ते १०% इंधन बचत आणि फ्लीट (गाड्यांचा ताफा) उपयोगात १%% वाढ झाली असल्याचे फ्लीट मालकांचे म्हणणे आहे.

कंपनीने , iALERT, Service Mandi, Leykart and eDiagnostics अशा कंपन्यांना अनेक प्रकारच्या डिजिटल सोल्यूशन्स प्रदान केलया आहेत.

2. नवीन स्विफ्ट २०२१ गाडी बाजारात

मारुती सुझुकीने ५.७ लाख ते ८.४ लाख रुपयांच्या किंमतीमध्ये नवीन स्विफ्ट २०२१ गाडी बाजारात आणली आहे (एक्स-शोरूम दिल्ली)

नवीन स्विफ्टमध्ये इतर स्पर्धक गाड्यांपेक्षा आणि आकर्षक किंमतींच्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक्समध्ये काही अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत.

स्विफ्टने मारुती गाड्यांची विक्रीची वाढ चालू वर्षातील१.८ लाख युनिट्स ते २.४ लाख युनिट्स एव्हढी वाढेल अशी अपेक्षा आहे.

3. भारती एअरटेलचा जाहिरात व्यवसायात प्रवेश

भारती एअरटेल कंपनीने एअरटेल ऍडव्हर्टायझिंग सुरु करुन जाहिरात व्यवसायात प्रवेश केला आहे. एक शक्तिशाली ब्रँड प्रोमोशनचा पर्याय यामुळे निर्माण झाला आहे.

एअरटेल जाहिरात सेवेमुळे सर्व प्रकारच्या ब्रँड्सला भारतातील दर्जेदार ग्राहकांपर्यंत जाहिरात करण्याची संधी मिळणार आहे.

मोबाइल डीटीएच आणि होम्स तसेच मोबाईलच्या एकूण व्यवसायांमध्ये एअरटेलकडे ३२० दशलक्षाहून अधिक ग्राहक आहेत

4. विप्रोचा ५०० दशलक्ष किंमतीचा करार

विप्रोने एस्टी लॉडरकडून (Estee Lauder -अमेरिकन सौंदर्यप्रसाधने निर्माता) ५०० दशलक्ष किंमतीचा कामाचा करार मिळविला आहे.

विप्रो अप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्स तसेच पायाभूत सुविधा व्यवस्थापन पुरवेल.

Share Trading Rules in Marathi I शेअर मार्केट ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे I

5. आदित्य बिर्ला फॅशनची नवी भागेदारी

आदित्य बिर्ला फॅशनने तरुण ताहिलियानी यांच्याबरोबर पुरुषांच्या पोशाख उत्पादनांना बाजारात आणण्यासाठी धोरणात्मक भागीदारी केली आहे.

कराराचा एक भाग म्हणून, एबीएफआरएल तरुण ताहिलियानीच्या विद्यमान लक्झरी वस्त्र व्यवसायात ३३% भागभांडवल संपादन करेल.

नवीन ब्रँड विशेष कार्यक्रम व सणांवेळी परिधान करायच्या पोशाखात कार्य करेल

नवीन ब्रँडचे पुढील पाच वर्षात देशभरात २५० हून अधिक स्टोअरमध्ये ५०० कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट आहे

ब्रँड रिटेल स्टोअरचा पहिला सेट सप्टेंबर २०२१ पर्यंत लॉन्च करेल

नव्या संस्थेत एबीएफआरएलचा ८०% हिस्सा असेल तर तरुण ताहिलियानी उर्वरित २०% हिस्सा ठेवतील.

Breaking News 24th feb 2021
Breaking News 24th feb 2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *