Breaking News – लक्ष्मी ऑर्गेनिक आणि क्राफ्ट्समन ऑटोमेशन शेअर बाजारात सूचीबद्ध
लक्ष्मी ऑर्गेनिक आणि क्राफ्ट्समन ऑटोमेशन शेअर बाजारात सूचीबद्ध
लक्ष्मी ऑर्गेनिक –
गुरुवारी लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीजची आयपीओसाठी १३० रुपये प्रती शेअर किंमत निश्चित करण्यात आली होती.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीजचा शेअर १५६.२० रुपयांवर सूचीबद्ध झाला. इश्यु प्राईसच्या तुलनेत तो २०.१५ टक्के अधिक किमतीवर लिस्ट झाला.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीजने १५५.५० रुपयांवर सूचीबद्ध झाला. तो १९.६२ टक्के जादा किमतीवर लिस्ट झाला.
क्राफ्ट्समन ऑटोमेशन –
क्राफ्ट्समन ऑटोमेशन लिमिटेडने १५ मार्च ते १७ मार्च २०२१ दरम्यान प्रारंभिक समभाग विक्री केली होती. यासाठी प्रती शेअर १४८८ ते १४९० रुपये इतका किंमत पट्टा निर्धारित करण्यात आला आहे. या योजनेत किमान १० शेअरसाठी गुंतवणूकदारांनी अर्ज केले होते.
समभाग विक्रीला गुंतवणूकदारांनी संमिश्र प्रतिसाद दिला होता. क्राफ्ट्समन ऑटोमेशनचा आयपीओ केवळ ३.२ पटीने सबस्क्राईब झाला होता.
क्राफ्ट्समन ऑटोमेशनचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये १३५० रुपयांना सूचीबद्ध झाला. इश्यु प्राईसच्या तुलनेत त्याची ९.६ टक्के कमी दराने बाजारात नोंदणी झाली.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर तो १३५९ रुपयांना नोंद झाला. इश्यू प्राईस पेक्षा त्याची किंमत ८.८ टक्क्यांनी कमी होती.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R