आजचे मार्केट अपडेट – 1 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स (Sensex) 81,867 वर बंद झाला आणि निफ्टी (Nifty) 25,010 च्या पातळीवर बंद झाला | Share market news in marathi

Share market news in marathi: शेअर बाजाराने आज, म्हणजे 1 ऑगस्ट रोजी नवा सार्वकालिक उच्चांक गाठला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 82,129 आणि निफ्टी 25,078 वर पोहोचला. मात्र, यानंतर शेअर बाजार थोडा खाली आला आणि सेन्सेक्स 126 अंकांच्या वाढीसह 81,867 वर बंद झाला.

त्याचवेळी निफ्टीतही सुमारे 59 अंकांची वाढ झाली. 25,010 च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 15 समभागांमध्ये वाढ तर 15 समभागांमध्ये घट झाली आहे. आज एफएमसीजी आणि ऊर्जा समभागांमध्ये अधिक वाढ झाली.

आजचे मार्केट : Market update

IndexPriceChange%change
Nifty 5025010.9059.750.24
BSE Sensex81867.55126.210.15
Nifty Bank51564.0010.600.02
BSE SmallCap54945.66-386.58-0.70
BSE MidCap48247.70-386.76-0.80

निफ्टि टॉप गेनर्स (Nifty top gainers):

CompanyPriceChange%change
Power Grid Corp361.1012.903.70
Coal India540.4018.203.49
ONGC341.757.552.26
Dr Reddys Labs6,887.95137.452.04
Shriram Finance2,989.2557.301.95

निफ्टि टॉप लूझर्स (Nifty top loosers):

CompanyPriceChange%change
M&M2,828.40-79.40-2.73
Hero Motocorp5,371.85-116.60-2.12
Tata Steel163.06-2.27-1.37
SBI862.65-9.75-1.12
Tata Motors1,144.40-12.25-1.06

आशियाई बाजार आज घसरले

  • आशियाई बाजारात आज घसरण झाली आहे. जपानचा निक्केई 2.49% आणि हाँगकाँगचा हँग सेंग 0.23% घसरला. चीनचा शांघाय कंपोझिट देखील 0.22% ने घसरला.
  • सीगल इंडिया लिमिटेडचा आयपीओ आजपासून सुरू झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये ५ ऑगस्टपर्यंत बोली लावू शकतील. कंपनीचे शेअर्स 8 ऑगस्ट रोजी शेअर बाजारात लिस्ट होतील.
  • एचडीएफसी बँक, रिलायन्स, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, एशियन पेंट्स आणि मारुती यांनी बाजार उंचावला. M&M, Infosys, L&T, SBI, ICICI बँक आणि कोटक बँक यांनी बाजार खेचला.
  • 31 जुलै रोजी अमेरिकन बाजारातील डाऊ जोन्स 0.24% च्या वाढीसह 40,842 वर बंद झाला. NASDAQ 2.64% वाढून 17,599 वर बंद झाला. S&P500 1.58% वर होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *