गोदरेज अप्लायन्सेसतर्फे एयर कुलर व्यवसायाच्या ‘पॅन इंडिया एंड टु एंड सप्लाय चेन’चे कंत्राट डिल्हिवरी लि. कंपनीस प्रदान I
गोदरेज अप्लायन्सेसतर्फे एयर कुलर व्यवसायाच्या ‘पॅन इंडिया एंड टु एंड सप्लाय चेन’चे कंत्राट डिल्हिवरी लि. कंपनीस प्रदान
गुरुग्राम, ३० जानेवारी २०२३ – गोदरेज अप्लायन्सेस या गोदरेज अँड बॉयस कंपनीच्या व्यावसायिक युनिटने त्यांच्या एयर- कुलर व्यवसायासाठी पॅन भारतात पुरवठा साखळी उभारण्याचे व हाताळण्याचे कंत्राट भारतातील सर्वात मोठी, पूर्णपणे इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स पुरवठादार डिल्हिवरी लि. कंपनीला दिले आहे. या भागिदारीअंतर्गत डिल्हीवरी गोदरेज एयर कुलर्सचे बाजारपेठेत वितरण करण्यासाठी आपली वेयरहाउसिंग आणि वितरण सुविधा वापरणार आहे.
डिल्हीवरी आणि गोदरेज अप्लायन्सेस कंपनीने संयुक्तपणे गाझियाबाद (एनसीआर) येथे नव्या वेयरहाउसचे उद्घाटन केले असून या वेयरहाउसद्वारे पॅन भारत पातळीवर सर्व गरजा पूर्ण केल्या जाणार आहेत. गोदरेज सिस्टीम्स आणि डिल्हिवरीची एंड टु एंड सप्लाय चेन प्लॅटफॉर्म यांच्या एकत्रीकरणामुळे एकाच, तंत्रज्ञानयुक्त प्लॅटफॉर्मद्वारे संपूर्ण पुरवठा साखळीची दृश्यमानता वाढेल.
पॉवर सेव्हिंग्ज आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी एयर कुलर्समध्ये इनव्हर्टर तंत्रज्ञानाचा वापर करणारी गोदरेज ही पहिली कंपनी असून त्यामुळे ग्राहकांना विशेषतः उत्तर व मध्य भागात जिथे उन्हाळ्यात तापमान खूप वाढते, त्यांना मोठा दिलासा मिळाला. कंपनीने नव्या उत्पादनांसह या विभागातील आपले अस्तित्व विस्तारण्याची योजना आखली आहे.
या घोषणेविषयी गोदरेज अप्लायन्सेसच्या एयर कुलर्स विभागाचे उत्पादन प्रमुख अमित जैन म्हणाले, ‘विश्वासार्हतेबरोबरच गोदरेजकडे विक्री आणि सेवेचे दमदार नेटवर्क आहे. नव्या क्षेत्रात जाण्यासाठी या बाबींचा लाभ आम्हाला होणार असून त्याचबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यात उत्पादने जलद व सहजपणे उपलब्ध करण्यासाठी भक्कम पाठिंबा देणाऱ्या भागिदारांची आम्हाला गरज आहे. एयर कुलर्स ही हंगामानुसार विकली जाणारी उत्पादन श्रेणी असून जलद वितरण आणि आवश्याक साठा या विभागाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल. डिल्हीवरीची तंत्रज्ञानावर आधारित पुरवठा साखळी लक्षात घेता ते आमच्या पसंतीचे भागीदार (पार्टनर ऑफ चॉइस) ठरले यात शंका नाही.’ डिल्हीवरीच्या सप्लाय चेन सोल्यूशन्स विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजगणेश सेतुपती म्हणाले, ‘गोदरेज अप्लायन्सेससाठी आम्ही पसंतीचे भागीदार असल्याचा आनंद झाला असून त्यांच्याबरोबर दीर्घ काळ काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आमच्या पुरवठा साखळीद्वारे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स, व्हाइट गुड्स, वाहनाचे सुटे भाग, औद्योगिक, औषध, आरोग्यसेवा, एफएमसीजी, रिटेल, ई- कॉमर्स आणि नव्या युगातील डीटुसी ब्रँड्स इत्यादींना विस्तृत उत्पादन श्रेणीचा पुरवठा केला जातो. विश्वासार्ह आणि दर्जेदार लॉजिस्टिक्सबरोबरच किफायतशीर सेवा देण्यावर आमचा भर असतो.’
डिल्हीवरीच्या ग्राहक व्यवसाय विभागाचे प्रमुख विवेक गुप्ता म्हणाले, ‘एलटीएल आणि एफटीएल सेवांसह केवळ वाहतूक सेवा पुरवठ्यापासून सुरू झालेला आमचा हा प्रवास आता एकत्रित सुविधा पुरवठ्यापर्यंत येऊन ठेपला आहे. आम्हाला खात्री आहे, की हे मॉडेल गोदरेज अप्लायन्सेससाठी इच्छित परिणाम मिळवून देईल आणि केवळ पहिल्या व दुसऱ्या श्रेणीच्याच शहरात नव्हे, तर ३, ४, आणि ५ व्या श्रेणीतील बाजारपेठांपर्यंत वितरणास हातभार लावून एयर कुलर बाजारपेठेतील मोठा हिस्सा मिळवून देईल.’
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- डॉ. मारुती पवार यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी प्रदान – भारताच्या ‘स्टील व्हिजनरी’च्या प्रेरणादायी वाटचालीला सलाम
- गोदरेज फाउंडेशनतर्फे ‘ग्लोबल अॅक्सेस टू टॅलेंट फ्रॉम इंडिया (GATI) फाउंडेशन’चे सहसादरीकरण
- स्मार्ट होम कॅमेऱ्यांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो – गोदरेज सर्वेक्षण
- बास्किन रॉबिन्सने क्विक कॉमर्स व स्नॅकिंग ट्रेंडसाठी रिटेल विस्तार केला
- विचार ते अंमलबजावणी: डॉ. अमित बागवे घडवत आहेत महाराष्ट्र उद्योगजगतात क्रांती