२०२० मधले १० सर्वाधिक श्रीमंत भारतीय उद्योजक
२०२० मधले १० सर्वाधिक श्रीमंत भारतीय उद्योजक
१ ) मुकेश अंबानी, रिलायन्स इंडस्ट्रीज – देशातील सर्वाधिक श्रीमन्त उद्योजक ठरण्याचा मान सलग नवव्या वर्षी मुकेश अंबानी यांनी कायम ठेवला आहे. २०२० अखेर अंबानी यांची मालमत्ता तब्बल ६,५८,४०० कोटी आहे. मुकेश अंबानी यांच्या एकूण मालमत्तेत ७३ टक्के वाढ झाली.
२ ) हिंदुजा बंधू , हिंदुजा समूह – श्रीमंत उद्योजकांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत हिंदुजा बंधू. ची संपत्ती २३ टक्क्यांनी कमी झाली. हिंदुजा बंधूची एकूण संपत्ती १,४३,७०० कोटी आहे.
३ ) शिव नाडार, एचसीएल टेक्नाॅलाॅजी – एचसीएल टेक्नाॅलाॅजीचे संस्थापक शिव नाडार यांची संपत्ती १,४१,७०० कोटी आहे.
४ ) गौतम अदानी, अदानी समूह – अदानी यांनी पहिल्यांदाच अव्वल पाच श्रीमंत उद्योजकांच्या यादीत स्थान मिळविले आहे. अदानी यांची संपत्ती वर्षभरात ४८ टक्क्यांनी वाढली.
५ ) अझीम प्रेमझी, विप्रो – अझीम प्रेमझी हे श्रीमंत उद्योजकांच्या यादीत पाचव्या स्थानी असून अझीम प्रेमझी यांची संपत्ती १,१४,४०० कोटी आहे.
६ ) सायरस पुनावाला, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया – करोना प्रतिबंधात्मक लसीचे उत्पादन घेणाऱ्या पुनावाला यांची संपत्ती ९४,३०० कोटी असून ते सहाव्या स्थानी आहेत.
७ ) राधाकृष्ण दमानी, एव्हेन्यू सुपरमार्केटस (डी मार्ट) – राधाकृष्ण दमानी पहिल्यांदाच पहिला १० श्रीमंत उद्योजकांच्या यादीत झळकले आहेत. त्यांची संपत्ती ८७२०० कोटी आहे.
८ ) उदय कोटक, कोटक महिंद्रा बँक – उदय कोटक देशातील आठवे श्रीमंत उद्योजक आहेत. उदय कोटक यांची संपत्ती ८७००० कोटी आहे.
९ ) दिलीप संघवी, सन फार्मा – दिलीप संघवी यांची मालमत्ता १७ टक्क्यांनी वधारून १२५०० कोटी झाली आहे.
१० ) सायरस आणि शापूरजी मिस्त्री, शापूरजी पालोनजी समूह – शापूरजी पालोनजी समूहाचे प्रमुख सायरस आणि शापूरजी हे दोन्ही भाऊ ७६००० कोटींच्या संपत्तीसह १० व्या स्थानी आहेत.