‘वर्क फ्रॉम होम’ वर्क करेल का ? – श्री गिरीश टिळक
‘वर्क फ्रॉम होम’ वर्क करेल का ? – श्री गिरीश टिळक
आज आपण कामाच्या व्यवसायाच्या ठिकाणी न जाता घरी बसून काम करणार आहोत यामुळे अनेक व्यवसायांवर परिणाम होणार आहे. अशी १५ ते २० व्यवसायांची यादी करता येईल. वर्क फ्रॉम होम हे रोझी पिक्चर बनत आहे पण प्रत्यक्षात हे होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा !
हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट , आयटी सर्विसेस, हाउसकीपींग, फॅसिलिटी मॅनेजमेंट यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे या मोठ्या कंपन्या जेव्हा वर्क फ्रॉम होम बद्दल बोलतात तेव्हा कॉस्ट कटिंग चा स्वार्थीपणा दिसतो. त्यांच्याकडे सोशल डिस्टंसिन्ग करीता योग्य स्पेस प्लॅनींग नाही, म्हणून ते हा विचार करीत आहेत. पण मुंबई, दिल्ली, बंगलोर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंघटित क्षेत्रात नोकऱ्या जाणार आहेत. याचा परिणाम सामाजिक अशांतता वर होणार आहे. याकरिता पर्यायांचा विचार केला पाहिजे .
आज चहावाले, रिक्षावाले, टॅक्सी , डबेवाले, कॅन्टीन ,उडपी हॉटेल मागील तीन महिने व्यवसाय बंद करून बसले आहेत. कर्ज काढून घेतलेल्या रिक्षा, पिढानपिढ्या चालणारे डबेवाल्यांचे व्यवसाय आज बंद आहेत. त्यामुळे वर्क फ्रॉम होम हि पॉलिसी बॅलन्स करण्याची गरज आहे. आपण समाजात एक मोठी दरी निर्माण करीत आहोत. हातावर पोट असलेल्यांचे धंदे बंद पडल्यास समाजात अस्थिरता निर्माण होणार आहे.
एक दिवस आड करून काम सुरु ठेवणे, ऑड – इव्हन डे नुसार दुकाने चालू ठेवणे यासारख्या गोष्टी करणे आवश्यक आहे. अनेक छोट्या मोठ्या गोष्टी करून रस्त्यावरची गर्दी कमी केली पाहिजे. रस्त्यावर चार गाड्यांऐवजी एक गाडी गेल्यास प्रदूषण, ट्रॅफिक कमी होईल. आज कोरोनाचा अतिरेक झाला आहे. उत्तर नसलेल्या प्रश्नांची चर्चा करण्यापेक्षा ज्या गोष्टी आयुष्यात केल्या नव्हत्या त्या करणे जरूर आहे. आपण अनेक कामे जसे जुन्या मित्र मैत्रिणीशी बोलणे, पुस्तक वाचणे, नातेवाईकांशी बोलणे यासाठी आपल्याकडे वेळ नव्हता.
आज सरकारने जीएसटी उशिरा भरण्यास परवानगी दिली आहे. पण आपण जर जीएसटी वेळेत भरला, टीडीएस वेळेत भरला तर पीएम फंडाला पैसे देण्याची गरज नाही. कर्जाचे हफ्ते वेळेत भरले तर बँकामध्ये एनपीए वाढ होणार नाही व बँक गरजूंना पैसे देऊ शकेल.
आज जे लोक माझ्याबरोबर माझ्या कंपनीसाठी काम करताहेत त्यांचे घर चालवण्यास मी मदत केली तर हे चांगले समाजकारण व अर्थकारण ठरेल.
आपल्यावरअवलंबून असलेल्यांची मानसिक व आर्थिक गरजांची काळजी घेतल्यास समाजात अशान्ति निर्माण होणार नाही. त्यामुळे आपण विचार करूयात कि वर्क फ्रॉम होम मध्ये डिसिप्लिन पाळत आहोत का, व्यायाम , आहाराच्या योग्य सवयी, या सर्वांचे पालन करा. फिजिकली फिट राहिलात तर आजाराशी मुकाबला करून मानसिक शान्ति मिळेल.
अर्थसंकेत – मराठी उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ !