अर्थसंकल्प २०२१ आणि वैयक्तिक गुंतवणूक
अर्थसंकल्प २०२१ आणि वैयक्तिक गुंतवणूक
भविष्य निर्वाह निधी: भविष्य निर्वाह निधीत अडीच लाख रुपयांच्या गुंतवणुकीच्या परताव्यावर आता कर आकारला जाईल.
सोने व चांदी: सोने तसेच चांदीवरील सीमाशुल्क १२.५ वरून ७.५ टक्के करण्यात आले आहे.
युलिप: १ फेब्रुवारी २०२१ नंतर खरेदी केलेल्या यूलिपच्या मॅच्युरिटीवर कोणत्याही प्रकारची कर सवलत मिळणार नाही. वार्षिक प्रिमियम २.५५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भरल्यास नवीन युनिक-लिंक्ड विमा योजेनसाठी हि अट लागू करण्यात आली आहे.
झीरो कूपन बाँड्स: सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आता झीरो कूपन बाँडमध्ये गुंतवणुक करण्याची संधी मिळणार आहे.
बँक ठेवी: दिवाळखोरीत गेलेल्या बँकेचे ग्राहक अडकून पडतात व त्यांच्या ठेवी काढता येत नाहीत परंतु आता ठेवींवरील विम्याचा दावा ५ लाख रुपयांपर्यंत करण्यात आला आहे. या आधी हा दावा प्रति व्यक्ती १ लाख रुपयांपर्यंत होता.
सुधारित तसेच विलंबित रिटर्न्स फक्त ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत दाखल करता येतील आणि ३१ मार्च २०२२ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे चालणार नाही.
७५ वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पेंशन किंवा व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी आयटी रिटर्न भरण्याची गरज नाही.
रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टकडून मिळणारे कोणतेही डिव्हिडंड हे टी डी एस स्रोतावरील कर सवलतीसाठी पात्र आहेत.
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा
अर्थसंकेत I अर्थ बजेटचा – सर्वसामान्यांसाठी काय ? – सी ए अनिकेत कुलकर्णी I Union Budget 2021
अर्थसंकेत युट्युब चॅनेलवर १० लाख Views पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार !!!
आपला उद्योग कमी खर्चात लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संपर्क करा ८०८२३४९८२२