बुधवारी विप्रो कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला रु. १८८९/- करोड चा नफा झाला असून त्यात मागील वर्षीचे तुलनेत त्यात १३.८१% ची घट झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील या कंपनीला रु. २१९१.८०/- करोड चा नफा झाला होता. निव्वळ विक्रीत ८.३२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु.१४,५४१/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १३,४२३.४०/- करोड होती.