देशातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वोडाफोन कंपनीने शुक्रवारपासून त्यांच्या प्रीपेड ग्राहकांसाठी मोफत व्हॉइस कॉल सुविधा दिली असून रु.१४४/- व रु.३४४-/ च्या पॅक मध्ये ते उपलब्ध आहेत. गुरुवारी एरटेल व आयडिया या कंपन्यांनी देखील हि सुविधा सुरु केली आहे. दोन्ही पॅक ची वैधता २८ दिवसांची असून 50MB डेटा वापराची सोय त्यात आहे. व नॅशनल रोमिंग वर मोफत अनलिमिटेड इनकमिंग कॉल्स ची सुविधा देखील देण्यात आली आहे. 4G स्मार्टफोन धारकांसाठी, पहिल्या पॅक ची किंमत रु.१४४/- ते रु.१४९/- असून ३०० MB डेटा वापराची सोय आहे. तर दुसऱ्या पॅक ची किंमत रु.3४४/- ते रु.3४९/- असून १ GB डेटा वापराची सोय आहे. आम्ही नुकतेच देशभरात नॅशनल रोमिंग वर प्रीपेड सुविधा मोफत सुरु केली असून आमचे लाखो ग्राहक आमच्याशी कनेक्ट राहून त्यांच्या प्रियजनांशी बातचीत करू शकतील. तसेच आमचे 4G ग्राहक अनलिमिटेड कॉल्स व १ GB डेटा सुविधा वापरू शकतील. असा विश्वास वोडाफोन इंडिया चे मुख्य वाणिज्य अधिकारी संदीप कटारिया यांनी व्यक्त केला. एरटेल , आयडिया, वोडाफोन या कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांनी नव्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम कडे वळू नये म्हणून समांतर नव्या सुविधा पुढील वर्षी १ एप्रिल पासून देण्याचे मान्य केले आहे. सध्या रिलायन्स डेटा व व्हॉइस मोफत देत असून १ एप्रिल पासून त्यावर दर आकारण्यात येतील. वोडाफोन ने देखील रु.२५५ वरील प्लॅन्स साठी 4G डेटा वापर दुप्पट केला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९८१९४९९२७९ http://arthsanket.in/ https://www.facebook.com/arthsanket