२०१७-१८ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GST मुळे अनेक ग्राहकाभिमुख व्यवसायांना समस्यांना सामोरे जावे लागले आहे. परंतु काही व्यवसायांनी यातून मार्ग काढत प्रगती देखील केली आहे. तयार कपड्यांची रिटेल विक्री करणारी भारतातील प्रसिद्ध कंपनी व्ही मार्ट रिटेल हि देखील त्यापैकी एक आहे. व्यवसायातील नव्या संधीचा शोध घेत पेनिट्रेटिव्ह प्रायझिंग स्ट्रॅटेजी वापरत या क्षेत्रातील मार्केट शेअर वाढवला आहे. जून २०१७ मध्ये कंपनीने त्यांची सरासरी विक्री किंमत ३% नि कमी केली होती. त्यामुळे विक्रीत ५.५% ची वाढ झाली आहे. कंपनीच्या ब्रँड अंतर्गत येणाऱ्या मालाच्या विक्रीत वाढ करण्याचा त्यांचा मानस आहे. एप्रिल-जून २०१७ दरम्यान कंपनीने ८ नव्या स्टोअर्स ची सुरवात केली आहे. त्याकरिता त्यांनी रु.१२/- करोड चा खर्च केला आहे. कंपनी टियर २/३/४ अंतर्गत येणाऱ्या शहरामध्ये स्टोअर्सचा विस्तार करणार आहे. पुढील तिमाहीत ते वेअर हाऊसींग तंत्रज्ञान व डेटा ऍनालीटीक्ससाठी गुंतवणूक करणार आहे. कंपनीला वार्षिक एकूण महसुलापैकी ८०-९०% महसूल तयार पोशाख विक्री व्यवसायातून येतो. त्यांची प्रति युनिट विक्री किंमत रु.१०००/- हुन कमी असल्याने मागणीत वाढ झाली आहे. GST अंतर्गत रु.१०००/- हुन कमी किमतीच्या मालावर ५% GST असून त्याहून अधिक किमतीच्या मालावर ८% ते १२% GST आहे. कंपनीला निव्वळ नफा व मार्जिन मध्ये या तिमाहीत वाढ झाली आहे.