टेलिकॉम क्षेत्रात वोडाफोन इंडिया भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर आयडिया सेल्ल्युलर तिसऱ्या क्रमांकावर आहे. व या दोन कंपन्यांनी मिळून नवे डेली डेटा बेनिफिट व मोफत अमर्याद व्हॉइस कॉल त्यांच्या प्रीपेड ग्राहकांसाठी आणले आहेत. रिलायन्स जिओ च्या प्राईम डेटा ऑफर्स बॊर्बर स्पर्धा करीत त्यांनी नवे प्लॅन्स आणले आहेत. रिलायन्स चा नवा प्लॅन १ एप्रिल २०१७ पासून सुरु होणार आहे. आदित्य बिर्ला ग्रुप ची कंपनी आयडिया अनलिमिटेड व्हॉइस व ५०० MB प्रति दिवस डेटा २८ दिवसांसाठी रु.३४८/- मध्ये देत आहे. 4G हँडसेट वापरणाऱ्या आमच्या डेटा न वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन असल्याचे कंपनीच्या एका प्रवक्त्याने सांगितले . तर वोडाफोन इंडिया , जिओ च्या रु.३०३/- या प्राईम प्लॅन सारखे फायदे देणारा नवा प्लॅन आणत आहे. या प्लॅन मध्ये रु.३४२/- मध्ये दर महिन्याला अमर्याद कॉलिंग व २८ GB डेटा व १ GB FUP देत आहे. तर रु.३४६/- मध्ये प्रीपेड ग्राहकांसाठी अमर्याद कॉलिंग व १० GB - २८ दिवसांसाठी देतील. तसेच एअरटेल ने याआधीच नवे प्लॅन्स आणले आहेत. तसेच जिओ प्राईम ऑफर अंतर्गत एकवर एक मोफत सेवा देत असून ३१ मार्च पूर्वी रु.३०३/- व रु.४९९/- व त्यावरील रिचार्जे वर अतिरिक्त फायदे मिळतील. अधिक माहितीसाठी आणि जाहिरातीसाठी संपर्क ९८१९४९९२७९