वेदान्ताने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत एकत्रित नफ्यात ८१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४८०२/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीने रु.२६४७/- करोड चा नफा कमविला होता. या तिमाहीत एकत्रित महसुलात १७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २७,६३०/- करोड आहे. ऑइल, गॅस ,अलुमिनियम व्यवसायातून कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. EBITDA मार्जिन २८.३% आहे. कंपनीला महत्वाच्या प्रकल्पावर कामगिरीत वाढ झाली आहे. या तिमाहीत रु.२८६९/- करोड चे अपवादात्मक लाभ झाले आहेत.