वेदांता रिसोर्सेस ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या मुख्य कार्यकारी अध्यक्ष या पदासाठी श्रीनिवासन वेंकटक्रिष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती शुक्रवारी करण्यात आली. या पदावर टॉम आल्बन्स यांनी २०१४ ते २०१७ या काळात काम केले. परंतु वैयक्तिक कारणास्तव त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कुलदीप कौर यांनी काही काळ या पदावर काम केले. वेदांता चे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी सांगतिले कि, वेंकटक्रिष्णन यांनी अँग्लोगोल्ड अश्यन्ति या गोल्ड माईन कंपनीमध्ये काम केले असून त्यांना जागतिक दर्जाच्या व्यवसायिक दृष्टिकोन, टेक्निकल स्किल, व्यवसाय कौशल्य, नैतिकता आणि मूल्यांचा संग्रह आहे. व त्यामुळे वेदांता ला त्यांच्या या कौशल्यांचा फायदा पुढील प्रगतीसाठी होईल. याआधी वेंकटक्रिष्णन यांनी द वर्ल्ड गोल्ड कौन्सिल व बिझनेस लीडरशिप सौथ आफ्रिका यांच्या संचालक पदी काम केले आहे. मिनरल कौन्सिल ऑफ सौथ आफ्रिका चे ते कौन्सिल मेम्बर देखील होते. वेंकटक्रिष्णन यांनी सांगितले कि, मार्केट मध्ये विस्तृत क्षमता असलेल्या वेदांता कंपनीबरोबर काम करण्याची संधी हि विशेष असून हे आव्हान मी निर्धार, श्रद्धा आणि तीव्र महत्वाकांक्षासह स्वीकारतो. व प्रत्येक भागधारकांना महत्वपूर्ण असा बदल घडविण्यात प्रयत्नशील राहीन. वेदांता ने नुकतेच ओडिसा मधील इलेक्ट्रोस्टील्स स्टील्स या स्टील प्लांट चा मालकी हक्क मिळवला आहे. व पुढील काही वर्षात या प्लांट चा विस्तार करण्याचे ध्येय आहे.