"अर्थ साक्षर पुरस्कार २०१६ - लक्ष्मीचा सन्मान करणारा एकमेव सोहळा" सौ. वर्षा कुंडईकर - प्रगतीशील गुंतवणूकदार पुरस्कार पैसे कमविणे व ते योग्यरीत्या गुंतविणे व त्या गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करणे हे सर्व सामान्य मध्यम वर्गीयांना सुद्धा शक्य आहे. अशा प्रकारे फक्त गुंतवणुकीतून स्वतःची विविध आर्थिक उद्दिष्टे पुर्ण केलेल्या व्यक्तींचा अर्थात गुंतवणूकदारांचा सन्मान अर्थसंकेतद्वारे केला जातो. ज्यामुळे सर्व सामन्यांना स्फुर्ती व मार्गदर्शन मिळते. शेअर्स, म्युच्युअल फंड, स्थावर मालमत्ता, सोने. जीवन विमा, आरोग्य विमा. अपघात विमा, भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती नियोजन, मुलांचे आर्थिक नियोजन व वारसपत्र अशा विविध प्रकारे गुंतवणूक व स्वतःच्या भविष्याचे सुयोग्य नियोजन करता येते. नक्की या जाणून घ्यायला कसे करता येते स्वतःच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन !