अर्थसंकेत प्रस्तुत NSE "अर्थ साक्षर पुरस्कार २०१६" दिमाखदार सोहळा संपन्न ! "अर्थसंकेतचा आणखी एक ऐतिहासिक कार्यक्रम" सर्वसामान्य गुंतवणुकदार, आर्थिक साक्षरता प्रचारक, व्यवसाय प्रशिक्षक, युवा उद्योजक व व्यावसायिक संस्था यांचा सन्मान आर्थिक साक्षरता आणि उद्योजक विकास या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अर्थसंकेत संस्थेद्वारे दरवर्षी दिला जाणारा "अर्थसाक्षर पुरस्कार" सोहळा दिमाखात संपन्न झाला. मराठी माणसांना नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या ऐतिहासिक व जागतिक स्तरावरील वास्तूमध्ये सन्मानित करण्याचा हा पहिला व एकमेव कार्यक्रम अर्थसंकेत संस्थेद्वारे आयोजित करण्यात आला होता. पैसे कमविणे व ते योग्यरीत्या गुंतविणे व त्या गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करणे हे सर्व सामान्य मध्यम वर्गीयांना सुद्धा शक्य आहे. अशा प्रकारे फक्त गुंतवणुकीतून स्वतःची विविध आर्थिक उद्दिष्टे पुर्ण केलेल्या व्यक्तींचा अर्थात गुंतवणूकदारांचा सन्मान अर्थसंकेतद्वारे केला जातो. ज्यामुळे सर्व सामन्यांना स्फुर्ती व मार्गदर्शन मिळते. अधिक माहितीसाठी संपर्क ९८१९४९९२७९