जून महिन्यात भारताच्या व्यापारी तुटीत घट दिसत असून मे महिन्यात मात्र हि तूट मागील ३० महिन्यातील सर्वाधिक होती. निर्यातीत ४.३९% ची वाढ झाली असून हि रक्कम $२३.५ बिलियन आहे. आयातीत १९% ची वाढ झाली असून हि रक्कम $३६.५ बिलियन आहे. त्यामुळे $१२.९ बिलियन ची वित्तीय तफावत जून मध्ये दिसत आहे. मागील वर्षी जून मध्ये $ ८.१ बिलियन ची वित्तीय तूट होती. तर मे महिन्यात हि रक्कम $१३.८४ बिलियन होती. मागील काही महिन्यात निर्यातीत देखील लक्षणीय वाढ झाल्याचे कॉमर्स अँन्ड इंडट्रीस मंत्रालयाकडून सांगण्यात आले. ३० क्षेत्रापैकी १५ क्षेत्रामध्ये निर्यातीत वाढ झाली आहे. त्यात इंजिनीरिंग गुड्स(१४.७८%),पेट्रोलियम प्रॉडक्ट (३.६%), मरीन रोडक्ट (२४.२७%), राईस (२७.२९%), ऑरगॅनिक अँन्ड इनऑरगॅनिक केमिकल (१३.२% ) यांचा समावेश आहे.