IT कन्सल्टन्सी फर्म टेक महिंद्रा ने घोषित केल्यानुसार, थ्रेट डिटेक्शन अँन्ड रिस्पॉन्स सर्विस मधील प्रगत व्यवस्थापनचा फायदा त्यांच्या ग्राहकांना करून देण्यासाठी कंपनीने न्यूयॉर्क मधील सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील LIFARS या कंपनीशी भागीदारी केली आहे. थ्रेट डिटेक्शन ,इंटिग्रेटेड सायबर रेसिलन्स , मिटिगेशन, इंसिडेन्ट मॅनेजमेंट या क्षेत्रात संशोधन करण्याकरिता टेक महिंद्रा चे सिक्युरिटी ऑपरेशन सेन्टर व LIFARS यांचे इंसिडेन्ट रिस्पॉन्स सर्विस यांना एकत्रित केले जाईल. टेक महिंद्रा चे रिस्क मॅनेजमेंट चे ग्लोबल हेड राजीव सिंग म्हणाले, सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असून त्याविरोधात सक्षम यंत्रणा निर्माण होणे आवश्यक आहे. याकरिता या दोन कंपन्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधरित सायबर ब्रीच अँन्ड इमरजेंसी रिस्पॉन्स सर्विसेस करिता संशोधन करतील. LIFARS चे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंडरेज क्रेहेल म्हणाले, ;टेक महिंद्रा बरोबर केलेल्या भागीदारीमुळे कंपनीच्या क्षमतेत वाढ होऊन जागतिक स्तरावर विविध कंपन्यांना गरज असलेल्या सायबर सिक्युरिटी मधील अदयावत तंत्रज्ञानावर काम करणे शक्य होणार आहे.