पुढील अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटलींनी कराची पुनर्रचना करून सोप्या पद्धती आणून आर्थिक व्यवहारात वाढ करावी , अश्या भावना FICCI चे नवे अध्यक्ष पंकज पटेल यांनी आज व्यक्त केल्या. कर रचना स्थिर व सोपी असावी. तसेच करदात्यांना त्रास न झाल्यास ते समाधानाने व आनंदाने या कामात टॅक्स डिपार्टमेंटला सहकार्य करतील. असे ते पुढे म्हणाले. २०१७-१८ चा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी ला अर्थमंत्री अरुण जेटली सादर करतील. चलनी नोटा रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयाबद्दल बोलताना ते म्हणाले, काही कालावधीसाठी हा त्रास नागरिकांना सहन करावा लागला तरीही देशाच्या भविष्यासाठी हा निर्णय योग्य होता.व औद्योगिक क्षेत्रात मोठे बदल घडतील. अनुत्पादक मालमत्ता बँकामध्ये जमा झाली आहे व त्याचा योग्य कामांसाठी वापर करता येईल. व व्याजदरात झालेली १% कपात औद्योगिक क्षेत्रास मदत करेल. पुढील काही महिन्यांत परिस्थिती सुरळीत होईल. असे ते म्हणाले. इकॉनॉमिक आऊटलूक सर्वे नुसार,चालू आर्थिक वर्षाची GDP तील वाढ ७.३% असल्याचे FICCI ने सांगितले.