इनपुट कॉस्ट मध्ये वाढ झाल्याने टाटा मोटर्स ने पॅसेंजर्स गाड्यांच्या किमतीत ऑगस्ट पासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकारातील सर्व गाड्यांवर किमतीत २.२% ची वाढ होईल. एप्रिल मध्ये देखील कंपनीने किमतीत ३% ची वाढ केली होती . तथापि विक्रीत सातत्य असल्याचे कंपनीने सांगितले. पॅसेंजर व्हेईकल बिझनेस युनिट चे प्रमुख मयंक पारीख यांनी सांगितले कि, खर्चात कपात करण्याचा प्रयत्न चालू असून इनपुट कॉस्ट मध्ये वाढ झाल्याने किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंधन व मेटल्स यांच्या किमतीत वाढ झाली आहे. टाटा मोटर्स सध्या छोट्या व मोठ्या प्रकारातील सर्व गाड्यांची विक्री करीत आहे. या गाड्यांच्या किमती रु.२.३६/- लाख ते रु. १७.८९/- लाख दरम्यान आहेत. किमतीतील वाढीमुळे विक्रीवर परिणाम होईल का असे विचारले असता ते म्हणाले, एप्रिल मध्ये किमती वाढवून देखील पहिल्या तिमाहीत विक्रीत सातत्य राहिले आहे. या क्षेत्रात पहिल्या तिमाहीत विकास दर १३.१% असूनही टाटा मोटर्स चा विकास दर ५२% ने वाढला आहे.