टाटा ग्लोबल बेव्हरेज ला डिसेंबर अखेरीस तिमाहीत निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ होत रु.१४४.८६/- करोड चा नफा झाला आहे. खर्चात कपात व चांगली कामगिरी यामुळे कंपनीला हा फायदा झाला आहे. BSE ला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला मागील वर्षी या तिमाहीत रु. ६०.४६/- करोड चा नफा झाला होता. एकूण उत्पन्न २.६०% नि वाढले असून हि रक्कम रु.१७४३.८६/- करोड आहे. मागील वर्षी कंपनीला रु. १६९९.६१/- करोड चे एकूण उत्पन्न मिळाले होते. या तिमाहीत कंपनीने जाहिरात व नवीन प्रॉडक्ट लाँच वर जास्त खर्च केला आहे. एकूण खर्च रु. १५९०.९५/ - करोड झाला असून त्यात १.९१% ची वाढ झाली आहे. मागील वर्षी हा खर्च रु.१५६१.०१/- करोड होता.