मणिपाल मधील सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बँक सलग तिसऱ्या तिमाहीत तोटा झाला असून जून अखेर तिमाहीत रु.१२८२/- करोड चा तोटा झाला आहे. मागील वर्षीचे तिमाहीचे तुलनेत तोट्यात ५ पट वाढ झाली असून मागील वर्षी बँकेला रु.२६३/- करोड चा तोटा झाला होता. निव्वळ व्याज उत्पन्नात ६% ची घट झाली असून हि रक्कम रु.१५०५.९/- करोड आहे. ट्रेजरी इन्कम मध्ये घट , मार्क टू मार्केट डिप्रिसिएशन , आपत्कालीन तरतुदीत वाढ यामुळे हा तोटा झाला आहे. अनुत्पादित कर्जात देखील वाढ झाली असून हे प्रमाण १२.५९% आहे.मार्च अखेर तिमाहीत हे प्रमाण ११.५३% होते. एकूण अनुत्पादित मालमत्ता रु.२६,३६२/- करोड आहे. आपत्कालीन तरतुदीत या तिमाहीत ३०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु.१७७४/- करोड आहे. एकूण डिपॉझिट्स मध्ये घट झाली असून हि रक्कम रु.२.६६/- लाख करोड आहे. तर एकूण वितरित कर्ज रु. १.९६/- लाख करोड आहे.