मराठी माणसाने उद्योग – व्यवसायात यावे, यातील खाचखळगे समजून घ्यावेत व एक यशस्वी उद्योजक व्हावे यासाठी काही संस्था प्रयत्नशील आहेत. मराठी समाजात उद्योजकता वाढविण्यासाठी कायम प्रेरणेचा झरा असणाऱ्या या संस्थांचे विशेष कौतुक करणे आवश्यक आहे. सुवर्ण कोकण यांना "उल्लेखनीय कामगिरी" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रातील अग्रगण्य झी २४ तास वृत्त वाहनी वरून दररोज सकाळी ६:३० वाजता 'सुवर्णकोकण- सामर्थ्य कोकणाचे' या शेतीकडून समृद्धीकडे घेऊन जाणाऱ्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या रूपाने मोठ्या दिमाखात सुरवात केली. संपूर्ण महाराष्ट्रात एक - दोन नाही तर हजारो उद्योजक सतिशजी परब यांनी संस्थेच्या माध्यमातून दिलेल्या मार्गाने यशस्वी उद्योग स्वाभिमानाने करत आहेत. संपुर्ण माहितीसाठी व्ही डी ओ नक्की बघा व इतर उद्योजकांना पाठवा. धन्यवाद ! अर्थसंकेत प्रस्तुत NSE "अर्थ साक्षर पुरस्कार २०१६" दिमाखदार सोहळा संपन्न ! "अर्थसंकेतचा आणखी एक ऐतिहासिक कार्यक्रम" सर्वसामान्य गुंतवणुकदार, आर्थिक साक्षरता प्रचारक, व्यवसाय प्रशिक्षक, युवा उद्योजक व व्यावसायिक संस्था यांचा सन्मान आर्थिक साक्षरता आणि उद्योजक विकास या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अर्थसंकेत संस्थेद्वारे दरवर्षी दिला जाणारा "अर्थसाक्षर पुरस्कार" सोहळा दिमाखात संपन्न झाला. मराठी माणसांना नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या ऐतिहासिक व जागतिक स्तरावरील वास्तूमध्ये सन्मानित करण्याचा हा पहिला व एकमेव कार्यक्रम अर्थसंकेत संस्थेद्वारे आयोजित करण्यात आला होता. अधिक माहितीसाठी संपर्क ९८१९४९९२७९