गुरुवारी सिमेन्स लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेश मधील ढाका येथील रूरल इलेकट्रीसिटी बोर्डाकडून त्यांना रु.१८७.४/- करोड चे काम मिळाले आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत ढाका ,चित्तगाँग व सिल्व्हेट येथे नवे स्वीचगेअर सबस्टेशन उभारण्याचे हे काम आहे. BREB हि कंपनी बांगलादेश शासनांतर्गत तेथील ग्रामीण भागात इलेकट्रीसिटी पोहचविण्याचे काम करते. BREB या प्रकल्पांतर्गत देशाची संपूर्ण इलेकट्रीसिटी डिस्ट्रिब्युशन सिस्टिम अदयावत करणार आहे. व २०२१ पर्यंत सर्वाना इलेकट्रीसिटी देण्याचे शासनाचे ध्येय पूर्ण करणार आहे. या प्रकल्पात लागणारी सर्व प्रॉडकट हे सिमेन्स इंडियाच्या फॅक्टरीत बनलेले आहेत.