"अर्थ साक्षर पुरस्कार २०१६ - लक्ष्मीचा सन्मान करणारा एकमेव सोहळा" डॉ. शिवांगी झरकर - "सर्वोत्कृष्ट व्यवसाय प्रशिक्षक" पुरस्कार व्यवसाय करताना येणाऱ्या अनेक अडचणी व पडणारे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यकता असते मार्गदर्शकाची. व्यवसाय प्रशिक्षक हा आपल्या उद्योग व्यवसायात आपली वाढ होण्यासाठी सतत मार्गदर्शन करीत असतो. अशा मार्गदर्शकांना उद्योग जगतासमोर आणणे हे अर्थसंकेत आपले कर्तव्य मानतो. डॉ. शिवांगी झरकर या त्यांच्या "बॉर्न टू बिझ" या संस्थेच्या माध्यमातून साल २००८ पासून अशा प्रकारे अनेक उद्योजकांना मार्गदर्शन करीत आहेत व यशस्वी उद्योजक घडवीत आहेत. BE ( Comp.), MBA-IT, MA( Psych.), Ph.D. ( Education Mgt.) अशा विविध पदव्यांनी त्यांचे ज्ञान भांडार समृद्ध आहे. अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला अर्थसंकेतचा मानाचा मुजरा !