भारतीय कॅपिटल मार्केट मध्ये परकीय गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीत वाढ होण्यासाठी सेबी ने गव्हर्नमेंट सिक्युरिटीज साठी परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवून रु.१.८५/- लाख करोड केली आहे. याआधी हि गुंतवणूक मर्यादा रु.१.५२/- लाख करोड होती. सेबीने हि माहिती एका परिपत्रकात दिली असून पुढे म्हटले आहे कि, RBI कडून मिळालेल्या माहितीनुसार हे बदल केले गेले आहेत. तसेच दीर्घकालीन मुदतीच्या परकीय गुंतवणुकीची मर्यादा देखील बदलली असून हि रक्कम आता रु.४६,०९९/- करोड पर्यंत मर्यादित केली आहे. याआधी रु. ६२,०००/- करोड पर्यंत गुंतवणुकीस परवानगी होती. या प्रकारच्या गुंतवणुकीत पेन्शन फंड, इन्शुरन्स फंड, सॉव्हरिअन वेल्थ फंड यांचा समावेश होतो. स्टेट डेव्हलपमेंट लोन मधील परकीय गुंतवणूकदारांकडून केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीची मर्यादा रु.२१,०००/- करोड वरून रु.२७,०००/- करोड करण्यात आली आहे. एप्रिल ते जून २०१७ दरम्यान गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मधील गुंतवणुकीबाबतीत RBI ने दिलेल्या सूचनांमुळे हे बदल केले गेले आहेत.