महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे नव - निर्वाचित अध्यक्ष श्री संतोष मंडलेचा यांचा पदग्रहण सोहळा वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला. माननीय सर संघचालक श्री. मोहन भागवत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी वालचंद हिराचंद व्याख्यानमाले अंतर्गत उपस्थित ६०० हुन अधिक उद्योजकांना मार्गदर्शन केले. रेल्वेमंत्री श्री. सुरेश प्रभु, महाराष्ट्र चेंबरचे विविध माजी अध्यक्ष श्री. शंतनू भडकमकर, श्री. राम भोगले, श्री. आशिष पेडणेकर सौ. मीनल मोहाडीकर तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.