रिलायन्स कॅपिटल च्या ब्रोकिंग अँन्ड डिस्ट्रिब्युशन विभागातील रिलायन्स सिक्युरिटीज ने आज दिलेल्या माहितीनुसार, ३० जून २०१७ अखेर तिमाहीत कंपनीच्या एकूण नफ्यात रु.७/- करोड ची वाढ झाली आहे. या कालावधीत मागील वर्षी कंपनीला रु.२८/- लाख चा एकूण नफा झाला होता. या तिमाहीत रु.८२/- करोड चे एकूण उत्पन्न मिळाले असून त्यात ५१% ची वाढ झाली आहे. तसेच मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु.५४/- करोड चा महसूल मिळाला होता. कंपनीने मागील काही महिन्यात डिजिटल तंत्रज्ञान प्रणाली स्वीकारली असून त्यांनी कॅश मार्केट सेगमेंट तसेच विविध गुंतवणूक पर्याय उपलब्ध केल्याने त्यांना अपेक्षित यश मिळाले आहे. असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी गोपकुमार म्हणाले. इक्विटी ब्रोकिंग मध्ये देखील उत्तम कामगिरी करीत सरासरी दैनिक इक्विटी उलाढाल रु.३९४२/- करोड पर्यंत वाढविली आहे. त्यात ४४% ची वाढ झाली आहे. ३० जून २०१७ अखेर कंपनीचे ८ लाख ब्रोकिंग अकाउंट्स आहेत.