इन्व्हेस्टमेंट बँकिंग सोर्सेस कडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल या कंपनीने रु.४०००/- करोड चा फंड लॉन्ग टर्म फायनान्सिंग माध्यमातून मिळवला आहे. याकरिता ग्रुप च्या २ उपकंपन्या रिलायन्स होम फायनान्स व रिलायन्स कमर्शिअल फायनान्स यांनी असेट सिक्युरिटी दिली आहे हि मालमत्ता काही खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी खरेदी केली आहे . कंपनीने मागील महिन्यात दिलेल्या माहितीनुसार, कर्जात कपात करण्याच्या दृष्टीने कंपनी पुढील १२-१८ महिन्यात इतर नॉन फायनान्शिअल व्यवसाय बंद करेल. रिलायन्स कॅपिटल हि कंपनी असेट मॅनेजमेंट , इन्शुरन्स , कमर्शिअल होम फायनान्स, इक्विटी अँन्ड कमोडिटी ब्रोकिंग या व्यवसायांत कार्यरत आहे. या आर्थिक वर्षात एप्रिल- जून तिमाहीत कंपनीला रु. २७२/- करोड चा एकत्रित निव्वळ नफा झाला होता.