रिलायन्स इंडस्ट्रीस लिमिटेड च्या दहेज मधील पेट्रोकेमिकल प्लांट च्या विस्तारास पर्यावरण परवाना खात्याकडून अनुमती मिळाली आहे. व हा प्रकल्प रु.१३,२५०/- करोड चा असेल. कच्या मालाचा अनियमित पुरवठा, शासनाच्या बदलत्या नियमावली, US कडून होणारा शेल गॅस चा इथेन चा पुरवठा या पार्श्वभूमीवर रिलायन्स ने त्यांच्या भरूच येथील पेट्रोकेमिकल प्लांट च्या विस्ताराचा निर्णय घेतला. एक्स्पर्ट अप्रायझल कमिटीच्या शिफारशीनंतर, पर्यावरण मंत्र्यांनी या प्रकल्पास अनुमती दिली. हा प्रकल्प सध्याच्या ७०० हेक्टर जागेत उभारला जाईल. रु.१३,२५०/- करोड चा अंदाजित खर्च अपेक्षित असून रु.४००/- करोड पर्यावरण सौरक्षण व संवर्धनासाठी वापरले जातील. या प्रकल्पासाठी वापरले जाणारे इंधन हे इथेन व लिन गॅस चे असेल. सध्या दहेज प्रकल्पात उत्पादन निर्मितीसाठी इथेन व प्रोपेन यांचे मिश्रण वापरले जाते. US कडून शेल गॅस इथेनचा पुरवढा न झाल्यास इथेन व प्रोपेन च्या प्रमाणात बदल केले जातील. या बदलामुळे इथिलिन ची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होईल. तसेच या प्रस्तावात क्लोरीनटेड पॉलिव्हिनाईल क्लोराईड, व्हिनाईल क्लोराईड मोनोमर व इथेन स्टोरेज टॅंक या प्लांट च्या उभारणीचा देखील प्रस्ताव आहे.